🟣आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
🟣आजरा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा.
🟣आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आजरा : – प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., अमृतनगर-गवसे येथील सन २०२६-२७ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन व होमहवन विधी गुरुवारी ( दि. २४ ) कारखान्याचे सन्माननीय संचालक शिवाजी तुकाराम नांदवडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता शिवाजी नांदवडेकर यांच्या शुभहस्ते, तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी व्हा. चेअरमन अनिल फडके यांनी उपस्थितांचे स्वागत करून कारखान्याने ऑफ सिझनमध्ये केलेल्या ऑव्हरहॉलिंग कामाचा आढावा घेतला.
कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी प्रास्ताविकात सन २०२६-२७ गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यानुसार गळीत हंगामात आवश्यक ३६० टनांची वाहतूक व्यवस्था व ऊस उपलब्धतेसाठी नियोजन करण्यात आले आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड परिसरातील ऊस नोंदणीचे काम पूर्ण झाले असून, नोंदणी केलेला ऊस कारखान्याकडे आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कारखान्याची मशिनरी अद्ययावत करण्यात आली असून, गेल्या चार-पाच वर्षांपासून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची खंडित झालेली परंपरा यंदा बदलून कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ८.३३ टक्के बोनस देण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच शासनाच्या निर्देशानुसार गळीत हंगामाचा शुभारंभ लवकर करून वेळेत कारखाना सुरू करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार यांनी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कामगारांना समाधानकारक बोनस मिळाले मुळे कामगारांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याबद्दल चेअरमन व व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार मानले व येत्या गळीत हंगामात कामगार पूर्ण क्षमतेने काम करून गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कमी पडणार नाहीत अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश देसाई यांनी केले.
कार्यक्रमास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वसंतराव घुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँकेचे संचालक व बँक प्रतिनिधी सुधीर देसाई यांच्यासह संचालक मंडळ, तज्ज्ञ संचालक, अधिकारी, कर्मचारी, युनियन पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

🟣आजरा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा.
आजरा : – प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., अमृतनगर – गवसे या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळ, गवसे येथे आयोजित करण्यात आली आहे.
चौकट.
विशेष सुचना.
सभेमध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२६ या अहवाल स्वीकारणे, ताळेबंद व नफा – तोटा पत्रकास मंजुरी देणे, सन २०२६-२७ च्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, लेखापरीक्षण अहवाल व इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या सभेस कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक व कार्यकारी संचालक यांनी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेच्या कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन चेअरमन, व्हा चेअरमन, कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
