विद्यार्थ्यांनी सुविधांचा फायदा करून घ्यावा.- अतुल जोशी.
शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील पुरबाधित शाळेला महिंद्रा फायनान्स च्या माध्यमातून गर्जना प्रतिष्ठान तर्फे बांधून देण्यात आलेल्या खोल्यांचे उदघाटन सोहळा संपन्न झाला
देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कुल, राजापूर येथे महिंद्रा फायनान्स, रेनिवेट इंडिया व गर्जना प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्या कम सभागृहाचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. राजापूर या पूरग्रस्त गावातील शाळेला वर्गखोल्यांची अत्यन्त गरज होती. गर्जना प्रतिष्ठानने ही समस्या हेरून महिंद्रा फायनान्स आणि रेनिवेट इंडिया यांच्या मदतीने दोन प्रशस्त वर्गखोल्या परिपूर्ण सुविधांसह बांधून दिल्या. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.
यावेळी महिंद्रा फायनान्सचे मानव संसाधन आणि प्रशासकीय प्रमुख अतुल जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मदतीचे हात अनेक आहेत, विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. इंग्रजी बोलता येणे महत्वाचे असून आतापासून विद्यार्थ्यांनी सराव केल्यास विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असे त्यांनी प्रतिपादन केले.
अल्पावधीत वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करून देणारे ठेकेदार गौरव पटेल आणि सुपरवायझर शैलेश सुतार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी महिंद्रा फायनान्सचे सिनिअर मॅनेजर विशाल भानुशाली, रेनोवेट इंडियाचे संचालक अलोक कदम, गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश बेलवाडे, अध्यक्ष दिगंबर मिसाळ,सचिव संतोष बेलवाडे, ज्ञान सरिता शिक्षण संस्थेचे चेअरमन आय. एन. हिंगमीरे, संचालक मंडळ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीशैल मठपती यांनी केले. आभार संतोष बेलवाडे यांनी मानले.
