हा जनआक्रोश मोर्चा नसून जन आदेश मोर्चा. – मिलिंद एकबोटे.
( हिंदू महापुरुषांची आठवण ठेवून जगले पाहिजेत. – महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.) { मोर्चा व सभा शांततेत उत्साहात संपन्न. }
आजरा. – प्रतिनिधी.

हा जनआक्रोश मोर्चा नसून जन आदेश मोर्चा आहे. तमाम हिंदू बांधवांनी हिंदू महापुरुषांची आठवण ठेवून जगले पाहिजेत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा लव्ह – जिहाद होणार नाही. लव जिहाद गो – हत्याकांड अशा हिंदू जनजागृती हिंदू आक्रोश आजरा येथील मोर्चा हिंदू मुक्ती महिला माता भगिनी संरक्षणार्थ लव – जिहाद गोहत्या धर्मांतर विरोधी कायदा करण्याबाबतच्या जनअक्रोश मोर्चाला संबोधित करताना मोर्चाचे प्रमुख वक्ते मिलिंद एकबोटे बोलत होते. प्रास्ताविक नाथ देसाई यांनी केले स्वागत व पाहुण्यांची ओळख अभिजीत रोडगे यांनी केली पुढे बोलताना म्हणाले श्री एकबोटे म्हणाले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत हे माझे गुरु होते. त्यांनी सांगितलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, चरित्र डोळ्यासमोर ठेवल्यास संभाजी महाराजांचा आदर्श हा आणखी दृढ होईल संभाजी महाराजांच्या विरोधात लढणारा औरंगजेब म्हणजे वाईट विकृतीचा होता ते समजेल यासाठी इतिहासाचा अभ्यास करा. प्रामुख्याने गाय वाचली तर हिंदू सुरक्षित राहील गाय आमची देवता आहे हिंदुस्थानात गाईंची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आजरा येथील रामतीर्थ तीर्थस्थळावर नमाज पठण होत असेल तर आम्हा हिंदू बांधवांना तुमच्या धर्मस्थळावर आरती म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. श्री एकबोटे यांनी शरद पवार, जितेंद्र आढाव, अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली शरद पवार यांनी अफजल कसाबच्या वकिलाला खासदार केलं ही कोणती वृत्ती आहे. असेही यावेळी एकबोटे म्हणाले.
हिंदू मुलींनी डोक्यावर टिकली लावण्याची सवय लावून घेतली पाहिजेत. – सौ. राजश्री तिवारी

यावेळी सौ. तिवारी म्हणाल्या लव – जिहाद चे एकूण १९ प्रकार सुरू आहेत. खोट्या प्रेमात फसवणूक करून प्रेम करण्यास भाग पडणे व काही भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून काही मुली फसल्या जातात यासाठी मुलींना धर्माची शिकवण दिली पाहिजेत प्रथम कपाळावर टिकली लावायला शिकवली पाहिजेत, सोबत मिरची पूड ठेवली पाहिजेत परंतु काही हिंदू मुली कपाळावर टिकली लावत नसल्याने नेमकी समोर येणारी मुलगी कोण आहे. हिंदू की अन्य जातीची हेच समजत नाही. यामध्ये बदल करणे गरजेचे आहे लव जहात मध्ये अनेक वेगवेगळी हत्यारे फसवणूक करण्यासाठी आहेत. त्याला आपण बळी पडू नये. मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी शिकवून घ्यावी. आपला धर्म समजून घ्या तसेच कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत कायद्याच्या बाबतीत हिंदूंनी पूरक असले पाहिजेत सर्वांनी हिंदू धर्माचे रक्षण करा व हिंदू राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
भिडे गुरुजींचे शिष्य लखन गुरुजी यांनी यावेळी धर्मरक्षणासाठी एकत्र या धर्मासाठी आपणही बलिदान दिले पाहिजेत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी जसे बलिदान दिले असे काही अनुभव डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत सकल समाजाची समृद्धी व्हायची असेल तर हिंदू एकटीची गरज आहे. यासाठी संघर्ष हा करावाच लागेल तरच धर्म व राष्ट्र घडेल असे लखन गुरुजी म्हणाले.
जो हिंदू तो बंधू व ज्याच्या कपाळी टिळा त्याच्याकडे खरेदी करा. – विक्रम पावसकर

यावेळी श्री. पावसकर हिंदू जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना म्हणाले येणाऱ्या काळात फक्त मोर्चा काढून चालणार नाही कृतीही करावे लागेल तर आपला धर्माचा आदर्श कायम ठेवायचा असेल तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान अशा फिल्मी हिरोईनचे चित्रपट पाहणे बंद करावे. जो हिंदू तो बंधू व ज्याच्या कपाळी टिळा त्याच्याकडे खरेदी करा व ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्या जवळ जाणे टाळा हे धोरण अवलंबले पाहिजेत. तर आणि तरच आपण या वृतीला ठेचू शकतो. ज्यांच्या आर्थिक नाड्या तुमच्या हातात आहेत. त्यांना त्या हत्याराने कमकुवत करा. ज्या देवाची पूजा करतात जो देवाची पूजा करतो त्याच्याकडेच देवाची फुले घ्या. असेही या मोर्चाला संबोधित करताना श्री पावसकर यांनी सुचित केले.
यावेळी आजरा, गडहिंग्लज, चंदगड सह कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आजरा शहरासह तालुक्यातील हिंदू बांधवांनी या मोर्चासाठी परिश्रम घेतले. आभार सुधीर कुंभार यांनी मांनले
मोर्चासाठी आलेल्या हिंदू बंधू व भगिनींना मातांना पिण्याची पाण्याची व्यवस्था फळे, सभेला बसलेल्या सर्व बांधवांना भगिनींना बसलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवकांनी केली होती.
हिंदू जन आक्रोश या प्रचंड मोठ्या मोर्चा शिस्तबद्ध हिंदू बांधव नियमाचे काटेकोरपणे पालन करत मोर्चा व सभा संपे पंर्यत प्रचंड उन्हातून देखील जागेवरून कोणी उठले नाही.
हिंदू जन आक्रोश मोर्चा पंचायत समिती आजरा पासून सुरुवात झाली आजरा तालुका सह गडहिंग्लज चंदगड परिसरातील हिंदू बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भगव्या टोपी, फेटे, शिवज्योत भगवे झेंडे यामुळे मोर्चा आकर्षित दिसत होता. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभू श्री राम यांच्या घोषणांनी आजरा शहर दणाणून सोडले होते.
