HomeUncategorizedआजरा एरडोंळ प्राथमिक शाळेतील थकीत लाईट बील - वीज पुरवठा खंडित या...

आजरा एरडोंळ प्राथमिक शाळेतील थकीत लाईट बील – वीज पुरवठा खंडित या समस्येला फाटा ( ग्रामपंचायतने केले सौर ऊर्जा युनिट. कोल्हापूर जिल्ह्यात पहिले. )

आजरा एरडोंळ प्राथमिक शाळेतील थकीत लाईट बील – वीज पुरवठा खंडित या समस्येला फाटा ( ग्रामपंचायतने केले सौर ऊर्जा युनिट. कोल्हापूर जिल्ह्यात पहिले. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील सौर उर्जेवर चालणारी पहिली जवाहर विद्या मंदिर एरंडोल हि प्राथमिक शाळा असून तालुक्यातील सर्व मराठी शाळांमध्ये विद्युत मीटर आहेत. परंतु शासनाकडून रीडिंग प्रमाणे विद्युत बिल भरणे बंधनकारक आहे.


यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राथमिक शाळा विद्युत बिल माफ केले जात नाही. यामुळे दरमहा किमान चारशे रुपये हे प्राथमिक शाळेचे विद्युत बिल भरावे लागते ही गोष्ट ग्रामीण भागातील प्राथमिक मराठी शाळांना परवडणारी नाही. व थकीत विद्युत बील असल्याने आजरा तालुक्यातील एरंडोल या शाळेतील वीज खंडित करण्यात आला आहे.

यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने बिलासाठी सरकारकडून कोणतेही अनुदान नसल्याने अनेक शाळेचे विज बिल थकीत आहे यावर उपाय म्हणून सौर ऊर्जा वापरणे हे गरजेचे आहे. याबाबत सरपंच सौ. सुजाता तळेवाडीकर, उप. सरपंच संतोष ढोनुक्षे, शाळा समिती अध्यक्ष मारुती एळकर, यांच्याशी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सौर उर्जा युनिट बसवण्या बाबत चर्चा केली व नेहमीच शाळेला मदत करणारी ग्रामपंचायत यांनी सदर सौर उर्जा युनिटसाठी सहकार्य केले व जिल्ह्यातील पहिले प्राथमिक शाळेतील युनिट तयार झाले आहे. व अंगणवाडी व प्राथमिक अशी दोन युनिट व संगणक तर यापुर्वी काही थकीत विद्युत बील भरुन ग्रामपंचायतने सहकार्य केले आहे. या बद्दल मुख्याध्यापक सुभाष विभुते, शिक्षक सुनिल शिंदे, गुंडू परीट माजी अध्यक्ष शाळाव्यवस्थापन समिती यांनी सरपंच सौ तळीवाडीकर, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री विभुते यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.