HomeUncategorizedधक्कादायक. - पोलीस उपनिरीक्षकाने नदीत घेतली उडी.- माजी सैनिकामुळे वाचले प्राण. 👇...

धक्कादायक. – पोलीस उपनिरीक्षकाने नदीत घेतली उडी.- माजी सैनिकामुळे वाचले प्राण. 👇 पहा तर घटना..

धक्कादायक. –
पोलीस उपनिरीक्षकाने नदीत घेतली उडी.- माजी सैनिकामुळे वाचले प्राण. 👇 पहा तर

नांदेड – प्रतिनिधी.

ड्युटीवरुन घरी परतत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. शेषराव राठोड असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. माजी सैनिकामुळे शेषराव यांना वाचवण्यास यश आले आहे. दरम्यान, शेषराव यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. बचावण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेषराव राठोड हे नांदेड पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेला केवळ चार महिनेच बाकी आहेत. गुरुवारी ड्युटीवरुन घरी परतत असताना गोदावरी नदीवरील गोवर्धन घाट उड्डानपुलावरुन त्यांनी उडी घेतली. शेषराव यांनी पोलीस गणवेशातच नदीत उडी घेतली. यावेळी गोवर्धन घाट उड्डानपुलावर उपस्थित अनेक लोकांनी त्यांनी नदीत उडी घेताना पाहिले. पाण्यात ते तडफडत असताना एका माजी सैनिकाने पाहिले.
माजी सैनिक असलेले बलजितसिंग बावरी यांनी अन्य लोकांच्या मदतीने शेषराव यांना पाण्यातून बाहेर काढले. रुग्णवाहिका यायला उशीर होत असल्याने बावरी आणि अन्य लोकांनी त्यांना तात्काळ रिक्षातून श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल केले. राठोड यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सेवेला केवळ चार महिने बाकी असताना पोलीस उपनिरीक्षकाने असा आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने मात्र नांदेड पोलीस दलात खळळ उडाली आहे
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.