HomeUncategorizedआजरा शाळकरी पीडित मुलीला छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक. - दोन दिवसांची...

आजरा शाळकरी पीडित मुलीला छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक. – दोन दिवसांची कस्टडी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील शाळकरी पीडित मुलीला छेडछाड प्रकरणी बुधवार व आज गुरुवार रोजी दोन दिवस आजरा शहर हिंन्दुत्ववादी कार्यकर्ते यांनी बंद पुकरला होता. याबाबत छेडछाड केलेले आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याना दोन दिवसांची कस्टडी दिली आहे.
याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. राजु नवले यांनी आजरा पोलिस स्टेशन मध्ये पत्रकार परिषदेत घेऊन दिली. यातील आरोपी ताहिर कुदरत मानगावकर. वय २४, इम्रान मूनाफ जमादार वय. २५ अशी असुन न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. ३६ तासात डॉ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील, सपोनी सुनील हरगुडे सह आजरा पोलीस स्टेशन कर्मचारी छडा लावला आहे.
सदर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच उद्या होणाऱ्या जनआक्रोश मोर्चा शांततेने पार करावा असे आवाहन यावेळी डॉ. श्री नवले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.