HomeUncategorizedमडिलगे लक्ष्मी देवीची यात्रा विविध उपक्रमाने उत्साहात साजरी. ( भव्य कबड्डी स्पर्धा...

मडिलगे लक्ष्मी देवीची यात्रा विविध उपक्रमाने उत्साहात साजरी. ( भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न. )

मडिलगे लक्ष्मी देवीची यात्रा विविध उपक्रमाने उत्साहात साजरी. ( भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न. )

आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील सालाबादप्रमाणे होणारी महालक्ष्मी देवीची यात्रा विविध उपक्रमाने उत्साहात साजरी झाली डिसेंबर ३०/३१ – २०२२ सालातील झालेली ही लक्ष्मी यात्रा मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळात शांततेत व कोरोनाचे निर्बंध पाळत लक्ष्मी यात्रा ग्रामस्थांनी साजरी केली होती.

लक्ष्मी यात्रा दिवशी लक्ष्मी उत्साहाने ग्रामस्थ भावित भक्त सनईच्यावाद्यात तालात खेळवतात तर या वर्षी मनसेचे आनंदा घंट्टे यांनी हालगी – घुमके हे वाद्य दिले होते यामुळे जागराला अधिक हौस आली होती रात्रभर लक्ष्मी देवी खेळुन पहाटे आपल्या पारंपरिक ठानकावर बसवली जाते. व दिवसभर ग्रामस्थ, पाहुणे, प्रामुख्याने गावतील लग्न होऊन माहेरी येणाऱ्या महिला यांच्या ओहोटी भरून दर्शन घेतात, ग्रामस्थांचा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम असा हा दिवसभरातील सालाबादप्रमाणे कार्यक्रम असतो.
या दिवशी कब्बडी स्पर्धा म्हणजे पाहुणे मंडळी सह जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील कब्बडी प्रेमीसाठी एक उत्सुकता असते. कोल्हापूर जिल्हा सह अनेक विभागातील नामवंत संघ येथील कब्बडी स्पर्धेत सहभाग नोंदवतात दोन दिवस चालणारी हि कब्बडी स्पर्धा योग्य पंच, मंडळाचे उत्कृष्ट नियोजन व ग्रामस्थांचे सहकार्य, दानशूर लोकांची अर्थिक मदत स्पर्धेत सहभाग घेणारे संघ अगदी आनंदाने परततात. पंचाच्या निर्णयावर संघाचे गुण असतात यामुळे योग्य पंच लाभलेले असतात. यामुळे स्पर्धा सुरू झाले नंतर गावातील किंवा स्पर्धेतील आयोजक कोणालाही निर्णय किंवा हस्तक्षेप न करता पंच जो निर्णय घेतील तो अंतिम समजून अंतिम सामना होईपर्यत आयोजक पंचानी दिलेल्या गुणानुक्रमे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात सहभागी होतात. यामुळे स्पर्धेत सहभागी होणारे संघ देखील आयोजकांचे धन्यवाद मानतात हा या गावातील स्पर्धा आयोजित करणारे मंडळ यांच्या अंगी उत्कृष्ठ गुण मानला जातो. या स्पर्धेसाठी भावेश्र्वरी कब्बडी संघ मडिलगे यांनी परिश्रम घेतले.

विजय पुरुळेकर (सर) यांनी संपूर्ण कबड्डी सामन्यांचे सूत्रसंचालन केले तर पंच म्हणून जीवन निकम, नाना सुतार, शिवाजी बोलके, बशीर सय्यद सह यांनी काम पाहिले.

या झालेल्या स्पर्धेतील खालील विजेता संघ.

१) मावळा कब्बडी संघ सडोली खालसा.

) शिवमृद्रा.कब्बडी संघ कौलव.

) हिरण्यकेशी कब्बडी संघ आजरा.

४) केदारी रेडेकर कब्बडी संघ महागाव

अष्टपैलू खेळाडू. – वैभव रमाडे ( कौलव)

उत्कृष्ट चढाई. – संकेत चव्हाण. ( सडोली )

उत्कृष्ट पकड.- प्रताप कुंभार ( सडोली)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.