नवीन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातून सत्ता जाणार का ? ज्योतिषी काय म्हणाले, वाचा.. 👇
मुंबई. – प्रतिनिधी.
नवीन वर्ष कसं असणार याची उत्सूकता प्रत्येकाला आहे. नेतेमंडळीचं वर्ष कसं जाणार, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि विशेषत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं?आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
एकनाथ शिंदे यांचं 2022 हे वर्ष हे खूप लाभदायक होतं. सत्ता कमवण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली. कुणाला कधीही वाटलंही नसावं की एकनाथ शिंदे सत्तापालट करणार. हे सर्व अचंबित करणार. पण महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगताना एकनाथ शिंदेसाठी हे संकटमय वर्ष असल्याचं सांगितलयं.
महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार येत्या नविन वर्षामध्ये त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. कदाचिक मध्यवर्ती निवडणूकांना त्यांना समोरे जावे लागू शकतं. त्यांच्यावर दैवी प्रकोप असल्याने त्यांच्याच सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना गुप्तरितीने त्रास संभवतो.”
विशेषतः जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर वर्षातील हा काळ त्यांच्यासाठी संकटमयी ठरणारा आहे. या काळात त्यांच्या जीवनात मोठ्या घडामोडी घडतील असेही म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे त्यांची हातातली सत्ता जाणार का? हा प्रश्न उद्भवतोय.
