३१ डिसेंबर रोजी गडावर गस्त घालावी. – शिवाज्ञा गडसंवर्धन अँन्ड रेस्क्यू टीमचे भुदरगड तहसीलदार यांना निवेदन.
भुदरगड. – प्रतिनिधी.
३१ डिसेंबर रोजी गडावर गस्त घालावी असे निवेदन शिवाज्ञा गडसंवर्धन अँन्ड रेस्क्यू टीमचे भुदरगड तहसीलदार यांना दि.२९/१२/२२ तालुक्याचे वैभव असणारे भुदरगड व रांगणा किल्यांवर प्लास्टिक व बाटलीमुक्त करणेसाठी व गडांचे पावित्र्य राखणेसाठी प्रशासनाने नवीन वर्षाच्या पाश्वभूमीवर पोलीस बंदोबस्त द्यावा. आशा आशयाची निवेदनाने शिवाज्ञा गडसंवर्धन अँन्ड रेस्क्यू टिमच्या वतीने भुदरगड तहसीलदार व वनरक्षक यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले कि गैरप्रकार टाळण्यासाठी कायमस्वरुपी चौकी उभारावी अशी मागणी देखील करण्यात आली.नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी ३१ डिसेंबर ला पार्ट्या करण्यासाठी अनेक पर्यटक गडावर गर्दी करतात,काही वेळा दारु पिऊन धागड-धिंगाणा देखील घालतात.आपल्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावण झालेल्या भूमीत गडकिल्यांचे पावित्र्य राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.यासाठी ३२ डिसेंबर २०२२ ला भुदरगड व रांगणा किल्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवून गस्त घालावी अशी आग्रही मागणी शिवाज्ञा गडसंवर्धन व रेस्क्यू टीमच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
