आजरा नगरपंचायत मासिक सभेत मनमानी कारभार करणारे अधिकारी धारेवर. – रात्री – अपरात्री येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन लावले जाईल मुख्याधिकारी. – डि. डि. कोळी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील नगरपंचायत मध्ये नगरसेवक वेळोवेळी अनेक सूचना करत असतात परंतु या सूचनेकडे अधिकारी दुर्लक्ष करतात व सभागृहाला कल्पना न देता किंवा समय मध्ये विषय न ठेवता मनमानी कारभार करतात याबाबत आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत अधिकारी अनिल गंदमवाड सह विविध प्रश्नाबाबत काही अधिकारी यांना नगरसेवकांनी धारेवर धरले घनकचरा संकलन ठेका ९० हजार रुपये असताना घनकचरा संकलन ठेका हा ठेकेदाराला ३७ हजार रुपयेला परस्पर का? दिला यामुळे नगरपंचायतचे वार्षिक एक लाख रुपये नुकसान केले आहे. हा सभागृहाला न विचारता परस्पर निर्णय का? घेतला याबाबत सभागृहाणे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आजरा येथील नगरपंचायतची मासिक सभा दि. २९ रोजी संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. स्वागत मुख्याधिकारी डि. डि. कोळी यांनी केले. परिपत्रक वाचन संजय यादव यांनी केले. या मासिक सभेस सत्ताधारी नगरसेविका शकुंतला सलावाडे, संजीवनी सावंत वगळता सर्व नगरसेवक अनुपस्थितीत होते.
रात्री – अपरात्री पिण्याचे पाणी येते, रस्त्यावरील वाहने वाहतूकीसाठी अडथळा निर्माण करत आहेत. आशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, मच्छीमार्केट मध्ये रस्त्यावर होणारी दुर्गंधी व आजरा शहर स्वच्छ व सुंदर व्हावे. मटण मार्केट व मच्छी मार्केट एकत्रित व्हावे. तसेच घनकचरा गाडी टेंडर हे अधिकारी यांनी परस्पर दिल्याने नगरपंचायत चे नुकसान झाले आहे याबाबत सभागृहात चर्चा झाली.
या चर्चेत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, नगरसेवक अभिषेक शिंपी, सुमैया खेडेकर, यासाराबिन लमतुरे संभाजी पाटील, किरण कांबळे सहभाग घेतला व मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शविला. व कोणत्याही अधिकाऱ्यांनी सभागृहामध्ये विषय घेतल्याशिवाय परस्पर कारभार करूनही असा सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या.
तसेच आजरा शहरातील होत असलेला अंतर्गत रस्ता हा निकृष्ट दर्जाचा असून सदर ठेकेदाराला बोलवून चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना द्याव्या.
याबाबत नगरसेवक संभाजी पाटील व किरण कांबळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आजरा शहरात नागरिक घनकचऱ्याची व्यवस्था असताना घरातील कचरा हा कचराकुंडीत न टाकता बाजूला टाकतात याबाबत फलक लावून सूचना देण्यात येणार आहे. यानंतर नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री कोळी यांनी सांगितले.
या मासिक सभेस नगरसेविका रेश्मा सोनेखान, सिमा पोवार, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव यांनी मानले.

नगरसेविका सुमैया खेडेकर.- मासिक सभेत आक्रमक.
प्रभागातील वेगवेगळ्या समस्या अनेकवेळा सभागृहांमध्ये मांडून देखील याबाबत अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. रात्री अप रात्री पिण्याचे पाणी येत आहे यापूर्वी कल्पना देऊन देखील पाण्याची मोटर दुरुस्ती कारण पुढे करून हा सततचा त्रास आहे. यामध्ये सुधारणा होऊन नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे, आजरा शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रभागातील नगरसेवकांची जबाबदारी आहे. असे असताना मागील अनेक मासिक सभेमध्ये मच्छी मार्केट स्थलांतर व्हावं व सध्या रस्त्याच्या कडेला बसून मच्छी विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला मच्छी मार्केटमध्ये बसून आपला व्यापार करावा अशा सूचना व नगरपंचायतने दंडात्मक कारवाई करून देखील जर व्यापारी सहकार्य करण्याची भूमिका घेत नसतील अशा व्यापाऱ्यांना नगरपंचायत कर्मचारी अधिकारी यांनी योग्य तो निर्णय घेऊ त्यांच्यावर कारवाई करावी.
सद्या मच्छी मार्केट शेजारी असणारी भिंत पाडून एक ठिकाणी मच्छी व मटन मार्केट करण्याचा नगरपंचायतचा जो निर्णय आहे. त्याला येथील स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्या निर्णयामुळे येथील स्थानिक रहिवासी यांना आरोग्याच्या दृष्टीने घातक विषय असून या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी होते. यामुळे नागरिकाच्या अरोग्यास त्रास होत आहे. यासाठी मच्छी मार्केट येथून स्थलांतर करावं व नगरपंचायतने वेगळी व्यवस्था करावी. यापूर्वी या दुर्गंधीबाबत आंदोलन करण्यात आले होते. यापुढे हा लढा चालू ठेवणार, तसेच प्रभागातील रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनासह, फोर व्हीलर वाहने पार्क केलेली असतात यामुळे नागरिकांना जाण्या – येण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. यापूर्वी अपघात होऊन जीविकास धोका झाला आहे. तर अनेक मोटरसायकलचे देखील अपघात होत असतात अशा वाहनांना नोटीस देऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्यास बंधन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करावी. यातील उद्देश प्रभागातील नागरिकांना किंवा आजरा शहरातील ग्रामीण भागातून ये जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये असा असून याबाबत नगरपंचायत अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा. याबाबत विषयाबाबत सौ. खेडेकर या मासिक सभेत सभागृहात आक्रमक झाल्या होत्या.
