Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र जे. पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी.( वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात...

जे. पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी.( वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.)

जे. पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी.
( वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.)

आजरा : प्रतिनिधी.

शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी रुपये असून, संस्थेकडे ७१ कोटींच्या ठेवी व ६९ कोटींचे कर्जवाटप असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी दिली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. यावेळी दिवंगत सभासद व देशातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष डॉ. उपासे यांनी प्रास्ताविकासह वार्षिक अहवालाचे वाचन केले.
संस्थेने १७ कोटींची गुंतवणूक केली असून दोन कोटींपेक्षा अधिक राखीव व इतर निधी आहे. संस्थेच्या गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा कार्यरत आहेत. सभेत विविध विषयांवरील ठराव मंजूर करण्यात आले. दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत व वार्षिक लेखापरीक्षक नेमण्याचा अधिकार संचालक मंडळास देण्यात आला. शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले. कोल्हापूर शाखा इमारत खरेदी व शाखाविस्ताराबाबतही मंजुरी घेण्यात आली.
सभेच्या कामकाजात संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासदांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले
.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.