जिओ सिम मोबाईल नेटवर्क. असुन शिमगा नसुन खोंळबा. – आजरा तालुक्यात जिओ मोबाईल नेटवर्क संमशा ..
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून जीओ कंपनी सह एअरटेल, व्होडाफोन, या कंपनीच्या मोबाईल टॉवर रेज हि असून शिमगा नसून खोळंबा अशी झाली आहे.
दिवसेंदिवस जिओ सह इतर सिम कार्ड कंपनीचे नेटवर्क प्रॉब्लेम वाटत असून याचा ग्राहकांना त्रास होत आहे.
मागील अनेक दिवसापासून ही समस्या असून जिओ बाजारात आल्यानंतर पूर्वी सिमकार्ड व यासाठी लागणारा रिचार्ज दर कमी असल्याने ग्राहक जिओ या सिम कार्ड पोर्ट करण्याकडे वळली गेली परंतु जिओ नेटवर्क हा नियोजनाचा अभाव असल्यामुळे हा त्रास ग्राहकांना होत आहे. अनेक ग्राहकांना वेगवेगळ्या समस्या येत आहेत अनलिमिटेड पॅक संपण्यापूर्वीच सिम कार्ड बंद होऊन इनकमिंग चालू राहते व आउटगोइंग बंद होतं याबाबत कस्टंबर घ्यायला विचारणा केली असता त्यांना त्याबाबतची काही कल्पना नसते यामुळे मोबाईल नेटवर्क रेंज हा ग्रामीण भागात मोठी समस्या होऊन बसली आहे पूर्वी टॉवर या ठिकाणी सेक्युरिटी गार्ड असत होते पण अलीकडे काहीच टॉवर जवळ जाड असतात यामुळे याबाबतची विचारता पूर्ण करावी हा ग्राहकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कस्टमर केअर आपली कम्प्लीट घेतलेली आहे असे सांगून व तुमची समस्या आम्ही नोंद करून कळवली आहे दोन दिवसात आपल्याला नेटवर्क फोरजी उपलब्ध होईल असे सांगण्यात येते. परंतु ऑनलाईन काम करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसत आहे यामुळे मागील चार दिवसांमध्ये आणि एक जिओचे ग्राहक वेगवेगळ्या कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत. याबाबत जिओ कंपनीने ताबडतोब नेटवर्क प्रॉब्लेम समस्या सोडवावी व ग्राहकांना होणारा नेटवर्क प्रॉब्लेम चा त्रास थांबावा अशी मागणी होत आहे.