व्यंकटराव येथे राष्ट्रीय ग्राहक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न..
( विविध स्पर्धेचे आयोजन. – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव )
आजरा. – प्रतिनिधी.

आमच्या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये तहसील कार्यालयातील परिपत्रकानुसार जागतिक ग्राहक दिनानिमित्त चित्रकला , रांगोळी व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना कागद व रांगोळी पुरवून आणखीन प्रोत्साहन दिले आजरा तहसीलदार विकास अहिर व जिल्हा बँक अधीक्षक तसेच तहसील कर्मचारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पाटीवर थाप दिली तसेच प्रशालेच्या या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय येथे २४ डिसेंबर २०२२ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मा तहसीलदार विकास आहिर, ग्राहक समिती अध्यक्ष तसेच पुरवठा अधिकारी यांच्या समवेत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यातील रांगोळी स्पर्धेसाठी ३० , चित्रकला स्पर्धेसाठी ७७, घोषवाक्य २५ व निबंध स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यातील प्रथम तीन व उत्तेजनार्थ तीन अशी लहान व मोठ्या गटात मिळून एकूण ३० बक्षिसपात्र विद्यार्थी निवडले.
या विविध स्पर्धेत प्रथम तीन आलेले विद्यार्थी – चित्रकला स्पर्धा लहान गट
प्रथम. मधुरा महेश माने,द्वितीय .आर्यन अमर केंबळे, तृतीय .साक्षी शिवाजी राणे
चित्रकला मोठा गट. – प्रथम .साहिल आनंदा इंगळे, द्वितीय .उमेश सोपान केरकर, तृतीय .सिद्धी सुभाष पंडित
रांगोळी स्पर्धा लहान गट. प्रथम .अनुष्का अजित हरेर
द्वितीय .माधवी जीवन आजगेकर
तृतीय .अर्चना इलगे
रांगोळी मोठा गट
प्रथम.. मुग्धा शिवाजी देसाई, द्वितीय.. श्रेया राजेंद्र कुंभार
तृतीय..प्रधान नीयती विकास
घोषवाक्य स्पर्धा
आस्था सचिन गुरव
मानसी पुंडलिक पोवार
विभावरी विक्रम जावळे
निबंध स्पर्धा
मेघा श्रीधर येरुडकर
क्षितिज मारुती डेळेकर
मेघा राजू राठोड
वरील उपक्रमासाठी कलाशिक्षक कृष्णा दावणे, श्री ए वाय चौगुले, श्रीमती एम एम जाधव, सौ एस डी इलगे, श्रीमती ए बी पुंडपळ,सौ. बी पी कांबळे ,सौ व्ही.ए वडवळेकर, श्री आर पी.होरटे, श्री पी व्ही पाटील, श्रीमती एस के कुंभार, श्रीमती एन ए मोरे, सौ व्ही.जे शेलार, आदी शिक्षक शिक्षिका यांनी नियोजन केले व इयत्ता पाचवी ते दहावी वर्गशिक्षकांनी सहकार्य केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री एस जी खोराटे, पर्यवेक्षक संजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमाचे पालक वर्गात कौतुक होत आहे.