व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये गणित दिवस उत्साहात साजरा.
आजरा. – प्रतिनिधी.
भारताचे जेष्ठ गणित तज्ञ श्रीनिवास रामानूजन यांच्या जयंतीनिमित्य विविध उपक्रम राबविले.प्रतिमापूजन प्राचार्य एस जी खोराटे व पर्यवेक्षक एस एन पाटील व गणित विषय शिक्षकांच्या हस्ते झाले. गणितीय रांगोळी, विविध गणितीय अभ्यास साधने प्रदर्शन व मांडणी केली होती गणितीय उखाने, गणित प्रतिज्ञा सौश्रुती पूंडपळ हिने घेतली. गणित विषय व त्याचे महत्त्व या विषयावर सिमरण पाटील निवेदिता खोराटे श्रावणी आर्दाळकर यांची भाषणे झाली, गणितीय म्हणी,सुविचार सादर केले. जवळपास ८० विद्यार्थ्यांनी गणित जत्रा या उपक्रमात सहभाग घेऊन वेगवेगळे गणिती मॉडेल सादर करून प्रशालेच्या मैदानावर दिवसभर सादरीकरण केले. या उपक्रमाचा प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. पाटील अनुष्का हेब्बाळकर यांनी सुत्रसंचलन केल. ,नियोजन सांस्कृतिक विभाग व गणित विषय समितीने केले. गणित दिनाची माहिती श्रीमती ए.बी. पुंडपळ मॕडम यांनी दिली आभार पी.एस.गुरव यांनी माडले.