आजरा अर्बन बँकेचे. – सभासदांना दि. २५ रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा परिसरातील आजरा अर्बन बँकेच्या सभासदांकरिता रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी स. १० वा. अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृह आज साजरा येथे आजरा अर्बन बँकेने सभासद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित केलेले आहे. मागील महिन्यात सदर कार्यक्रम हा महिला सभासदाकरिता घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आजरा तालुक्यातील महिलांच्या कडून चांगला प्रतिसाद लाभला होता.
सदर होणारा प्रशिक्षण कार्यक्रम हा पुरुष सभासद करता असून
कार्यक्रमासाठी विषय. – सहकारातून समृद्धीकडे, सुरक्षित आर्थिक व्यवहार, आर्थिक साक्षरता या विषयावर प्रामुख्याने मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व बीजभाषक अरुण काकडे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर तर तज्ञ मार्गदर्शक धीरज देशपांडे चार्टर्ड अकौटंटस् तसेच प्रशांत गंभीर मुख्य कार्यकारी अधिकारी आजरा अर्बन को-ऑप.बँक आजरा तसेच या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी व संचालक मंडळ असणार आहे. अशी माहिती आजरा अर्बन ऑप बँक लिमिटेड आजरा व्यवस्थापनाने दिली आहे.
