पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फे जि.प.शाळा बोरगाव व जि. प. शाळा बामणोली ता. चिपळूण,जि.रत्नागिरी येथे साहित्य वाटप
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील , सहसचिव वैभव घरत , सल्लागार हनुमंता चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फे जि.प.शाळा बोरगाव व जि. प. शाळा बामणोली ता. चिपळूण,जि.रत्नागिरी येथील शालेय मुलं व मुलींना मोफत क्रीडा साहित्य, ड्रम सेट,लेझिम तसेच खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल श्री.प्रकाश चव्हाण (विभागीय अध्यक्ष- सैनिक फेडरेशन),श्री.सुनिल हळदणकर (सरपंच – बोरगाव),श्री.नरेश पागडे(उपसरपंच – बामणोली) हे उपस्थित होते.पंचरत्न मित्र मंडळातर्फे अध्यक्ष- श्री.अशोक भोईर,सचिव – श्री.प्रदीप गावंड तसेच श्री.वैभव घरत, श्री.डी एम मिश्रा,श्री.रहीम शेख, श्री. डी. एफ निंबाळकर, श्री. तुकाराम वणे,श्री.संतोष नाईक,श्री. प्रकाश शेजवळ इ. कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.वैभव घरत यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे सर्व सभासद,देणगीदार,हितचिंतक यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. यापुढेही आपले सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल अशी अपेक्षा मंडळ तर्फे व्यक्त करत कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

