HomeUncategorizedओसरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल जळून खाक.!.- सुदैवानं मोठी जीवितहानी टळली ; ३५...

ओसरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल जळून खाक.!.- सुदैवानं मोठी जीवितहानी टळली ; ३५ प्रवासी सुखरुप बचावले..!

ओसरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल जळून खाक.!.- सुदैवानं मोठी जीवितहानी टळली ; ३५ प्रवासी सुखरुप बचावले..!

कणकवली/प्रतिनीधी
पुणे ते सावंतवाडी जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम. एच. १२ के. क्यू. ५७६९ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स ला ओसरगाव टोल नाक्याजवळ सकाळी ६ वा. च्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदरची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या गाडीत ३५ प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.