अनिश हॉलिडेज कोल्हापूरची शाखा. – आता सेवेसाठी आजऱ्यात. – देश विदेशात सहलीवर जाण्याची संधी होणार उपलब्ध.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथे अनिश हॉलिडेज कोल्हापूरची शाखा पर्यटकांच्या व विदेशात सहलीवर जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे.
आजरा येथील एकता कॉलनी या ठिकाणी अनिश हॉलिडेज या कार्यालयाचे उद्घाटन पत्रकार संभाजी जाधव यांच्या हस्ते दि. १७ डिसेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या गिता पोतदार होत्या.
सहलीवर जाणाऱ्या पर्यटकांना माहिती देताना आजरा कार्यालयाच्या प्रमुख नंदा पाटील म्हणाल्या आजरा तालुक्यातील पर्यटकांना आपल्या मित्र परिवार व कुटुंबासह जीवनातील विरंगुळा व अनेक देशे विदेशातील पर्यटन स्थळे व धर्मस्थळे सह विविध ठिकाणी योग्य दरात सहलीवर घेऊन जाण्याची व सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची राहील यासाठी आपल्या जीवनातील अनमोल वेळ आपण सहलीसाठी देखील द्यावा. यासाठी आमचे सहकारी राहील असे सौ पाटील म्हणाल्या.
यावेळी सौ. सोनाली देशपांडे, सुरेखा सुतार, प्राजक्ता गिलबीले, जितु खवरे सह आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ पूजा पाटील यांनी आभार मानले.

