आजरा तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुक सरपंच सदस्य यांचा सत्कार.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतील सरपंच व सदस्य यांना पुढील कार्यास शुभेच्छा व सत्कार अण्णा भाऊ संस्था समूहाच्या वतीने अशोक चराटी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
स्वागत भैय्या टोपले यांनी केले. तर विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जी. एम. पाटील व विलास नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना अशोक चराटी म्हणाले बिनविरोध झालेल्या माझ्या पाच ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे नेहमी सहकार्य राहील. व निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीवर देखील मतदार आमच्या आघाडीला सहकार्य करतील व प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य यामध्ये चाफवडे- धनाजी दळवी, पोळगाव – माधुरी गुरव, लाटगाव – वामन सुतार, आंवडी धनगरवाडाचे बयाजी मिसाळ, पारपोली. – प्रियंका शेटगे, यांच्यासह बिनविरोध ग्रामपंचायत झालेल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच आजरा अर्बनचे उपाध्यक्ष रमेश कुरुणकर, संचालक सुरेश डांग, डॉ. दिपक सातोसकर, आनंदा फडके, मारुती मोरे, कारखाना संचालक दशरथ अमृते, सुतगिरण संचालक डॉ. संदिप देशपांडे, अनिकेत चराटी, राजु पोतणीस, सह अशोक चराटी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ देशपांडे यांनी आभार मानले.
