HomeUncategorizedआजरा साखरची ३० नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा. चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा साखरची ३० नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा. चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा साखरची ३० नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा. चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजारा. – प्रतिनिधी. १४

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याची ३० नोव्हेंबर अखेरची ऊस बिले दि. १६/११/२०२२ ते ३०/११/२०२२ रोजी गाळप झालेल्या ऊसाची ३००० रु प्रमाणे विनाकपात ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे
आजरा साखर कारखान्याचे ४४ दिवसात १३०२३० मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवून १०.६३% उताऱ्याने १३५६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
२०२२/२३ कारखान्याने ४.०० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून. त्याकरिता पुरेशी बीड व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणा ऊस तोडणी करता कार्यरत ठेवली आहे. कार्यक्षेत्रामध्ये पाळी पत्रकानुसार ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे सर्व शेतकऱ्यांच्या कारखानाकडे नोंदणीला संपूर्ण ऊस नियोजकपूर्वक काळात करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे आलेल्या उसाची बिले रुपये ३००० मे.टन प्रमाणे विनाकपात एकरक्कमी व तोडणी वाहतूक बीलेही नेहमीप्रमाणे वेळेवर अदा करण्याची नियोजन केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने कारखाना क्षेत्रातील व कारखाना क्षेत्राबाहेरील सर्व ऊस आजरा कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन केले आहे.
यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.