HomeUncategorizedवारकरी संप्रदायाने समाजाला बळ देण्याचे काम केले. - संकल्पना व संयोजक प्रा....

वारकरी संप्रदायाने समाजाला बळ देण्याचे काम केले. – संकल्पना व संयोजक प्रा. सुनील शिंत्रे.आजरा येथे दि २१ डिसेंबर रोजी होणार वारकरी कीर्तन संमेलन.

वारकरी संप्रदायाने समाजाला बळ देण्याचे काम केले. – संकल्पना व संयोजक प्रा. सुनील शिंत्रे.
आजरा येथे दि २१ डिसेंबर रोजी होणार वारकरी कीर्तन संमेलन.

आजरा. – प्रतिनिधी.

वारकरी संप्रदायाने समाजाला बळ देण्याचे काम केले आहे या कीर्तन संमेलनाच्या माध्यमातून चांगली चळवळ उभा करण्याचा मानस असल्याचे बोलताना वारकरी कीर्तन संमेलनाचे संकल्पना व संयोजक प्रा. सुनील शिंत्रे पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वागत युवराज पोवार यांनी केले. पुढे श्री. शिंत्रे म्हणाले. या पहिल्या किर्तन संमेलनातून चांगली सुरवात होत आहे. आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा, परंपरा लाभली पाहिजेत व चांगल्या विचारातून चांगलंच मिळतं हा सांप्रदायाचा इतिहास आहे. गेली अनेक शतके महाराष्ट्राची संस्कृती भूमी समृद्ध करणाऱ्या वारकरी परंपरा तिचे तत्त्वज्ञान आणि कीर्तन याचा ऐतिहासिक आढावा घ्यावा. या हेतूने आजरा येथे वारकरी कीर्तन संमेलन घेत आहोत वारकरी तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात वारकरी कीर्तनाचा मोठा वाटा राहिला आहे. संत नामदेवराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा तुकोबांनी अधिक समृद्ध केली संत गाडगेबाबांनी ती लोकाभिमुख केली शेकडो वर्षे मराठी समूहाचे समाजमन घडवण्याचे काम कीर्तने केले आहे. या होणाऱ्या कीर्तन सोहळ्यासाठी आजरा चंदगड गडहिंग्लज सह कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी बंधू-भगिनी सह नागरिकांनी लाभ घ्यावा असे श्री शिंत्रे म्हणाले.
यावेळी कॉ. संपत देसाई यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला समाजामध्ये ज्ञान म्हणजे सर्वात मोठे हत्यार आहे. व ज्ञान सर्व दूर पोहोचावे हाच आमचा यातील उद्देश आहे. आपल्या अभ्यास चिंतनासह अमुक वर्मीने कीर्तन आणि एकंदरीत वारकरी परंपरेला भक्कम तात्विक पाया देणाऱ्या सद्गुरु बाबासाहेब आचरेकर यांच्या पुण्यतिथीचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. तीच्या जन्मभुमित हे किर्तन संमेलन होत आहे. त्याचा अभिमान, असल्याचे श्री देसाई म्हणाले. या संमेलना बाबत माहिती देताना प्रा.राजा शिरगुप्पे म्हणाले किर्तन परंपरा ही संतांनी उभी केली आहे. बहुजनांसाठी तयार केलेली कीर्तन परंपरा महाराष्ट्राच्या क्रांतिकारी पाऊल आहे. यासाठी कीर्तन परंपरा ही महत्त्वाची असल्याचे श्री.शिरगुप्पे यांनी सांगितले. यावेळी मुकुंदराव देसाई म्हणाले. या कीर्तन सोहळ्याचा वारकरी सांप्रदाय मधील मंडळी सह परिसरातील तीनही तालुक्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे म्हणाले.
यावेळी संजय घाटगे, श्रीधर पाटील, ह. भ. प. संजय जाधव ह. भ. प गौरव सुतार, ह. भ. प. अरुण जाधव सह तालुक्यातील वारकरी संप्रदाय मंडळाचे सदस्य उपस्थित होते. श्री देसाई यांनी आभार मानले.

{ संमेलन नियोजन. या संमेलनासाठी आजरा तालुका सह गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील वारकरी दिंड्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी ९ वा. विठ्ठल मंदिर आजरा येथे सर्व दिंड्या एकत्र आल्यानंतर गजरात दिंड्या कार्यक्रम स्थळाकडे प्रस्थान करतील संमेलन ठीक १० वाजता सुरू होईल ज्ञानेश्वरी आणि तुकोबाच्या गाथेचे पूजनाचे संमेलनाला सुरुवात होईल १२ वाजेपर्यंत उद्घाटन सत्र होईल संमेलनाचे अध्यक्ष ह भ प श्यामसुंदर सोन्नर महाराज तर उद्घाटक ह भ प भटक आणि स्वागताध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे हे पहिल्या उद्घाटन सत्रात बोलतील. दुपारी १२ ते २ या वेळेत वारकरी संतांच्या साहित्यातील सामाजिक समता हा परिसंवाद होईल रिंगणचे संपादक सचिन परब, यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवाद ह. भ .प देवदत्त परुळेकर वेंगुर्ला, संपत देसाई आजरा धम्मकीर्ती महाराज परभणी, ज्ञानेश्वर बंडगर महाराज पंढरपूर, ताई महाराज मंगळवेढेकर आपले विचार मांडणार आहेत. दुपारी २ ते २.४५ या वेळेत गावाबाहेरून आलेल्या दिंड्या आणि वारकरी यांना स्नेहभोजन असेल यानंतर २.४५ ते ३ या वेळेत डॉ. नवनाथ शिंदे यांचे गाडगेबाबा दर्शन हा कार्यक्रम होईल दुपारी ३ ते सायंकाळी ५ ह.भ.प सुहास फडतरे महाराज यांचे कीर्तन होईल यानंतर ज्ञानेश्वरी माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांच्या उपस्थितीत व गोकुळच्या संचालिका श्रीमंती अंजना रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ सर्व दिंड्या प्रमुखांचा सत्कार होईल या वारकरी कीर्तन संमेलनाचे स्वरूप या पद्धतीने असणार असल्याचे संयोजक समितीने माहिती दिली आहे. }

( प्रमुख उपस्थिती. ह भ प संदीप कोंडकर महाराज, ह. भ. प. भाऊसाहेब पाटील महाराज, आजरा नगरपंचायत नगराध्यक्षा. ज्योत्स्ना चराटी, उप नगराध्यक्षा. अस्मिता जाधव, यांची प्रमुख उपस्थिती आहे. )

( निमंत्रक. – मुकुंददादा देसाई, कॉ. संपत देसाई, साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, संजय घाटगे सह संयोजक समिती या संमेलनाचे निमंत्रक आहेत. )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.