HomeUncategorizedचंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त म्हणाले…👈🏼👇

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त म्हणाले…👈🏼👇

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त म्हणाले…👈🏼👇

मुंबई :- प्रतिनिधी.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. एखादा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे.शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट पसरलीय. चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी देखील तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, आज पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेचा आता विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.
“चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे. महापुरूषांच्या कामाबद्दल बोलताना त्यांच्या मनाचा मोठेपणा किती होता हे चंद्रकांत पाटील यांना सांगायचं होतं. परंतु, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. शिवाय त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी देखील मागीतली आहे. तरी देखील त्यांच्यावर शाई फेकण्यात आली, हे चुकीचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमधील काही वक्यव्यांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच नेत्यांना सल्ला देखील दिलाय. सर्वांनीच बोलताना भान ठेवलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर देखील देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राचे खासदार अमित शाह यांना भेटले असले तरी आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. शिवाय आमची बाजू न्यायालयात भक्कम आहे, असे कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आमची देखील बाजू भक्कम असल्याचे म्हटले आहे. “प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू मांडली, आम्ही आमची बाजू मांडू. गेल्या 60 वर्षांपासून त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. आम्ही देखील आमची भूमिका बलणार नाही. सीमावादांचं प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयच यावर योग्य तो निकाल देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.