जनता गृहतारण संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रास मंजुरी–चेअरमन मारुती मोरे.

आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील सामान्यांचे स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणणाऱ्या व अल्पावधीत प्रगती पथावर असलेल्या जनता गृहतारण संस्था आजरा या संस्थेस महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मंजूर झाल्याची माहिती .- संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी दिली.
सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठेऊन रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना संस्थेला राज्य कार्यक्षेत्र मिळणे हे संस्थेच्या प्रगतीचे लक्षण असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले.
राज्य कार्यक्षेत्र असणारी जनता गृहतारण ही एकमेव संस्था म्हणून ओळखली जात असून संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे यासाठी मोलाचे योगदान असल्याचे। त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.संस्था स्थापनेवेळी। आजरा हेच संस्थेचे कार्यक्षेत्र होते, त्यानंतर संस्थेची वाढती लोकप्रियता व विश्वासाहर्ता। लक्षात घेऊन संचालक मंडळाने कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र केले.संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार,काटकसरीने धोरण, कर्मचाऱ्यांची तत्पर व विनम्र सेवा यामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन केलेने कोल्हापूर जिल्ह्यानंतर सांगली व सातारा जिल्हा संस्थेला मिळाले.संस्थेने ऑडिट वर्ग सतत अ वर्ग मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
ठेवींवरील व्याजाचे आकर्षक दर, घर बांधकाम किंवा प्लॉट खरेदीसाठी एक कोटीपर्यंत कर्ज, कमी कालावधीत कर्ज मंजुरी, गृहकर्जाच्या परतफेडीच्या व्याजावर असणारी प्राप्तिकर सवलत,व सर्व शाखांचे संगणकीकृत व्यवहार यामुळे संस्थेकडे ग्राहकांचा ओढा वाढत असल्यानेव्ही संस्थेची आर्थिक प्रगती पाहूनच राज्याचे सहकार विभागाने संस्थेला राज्य कार्यक्षेत्र मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले