आत्मसन्मानासाठीचा लढा टोकादार करण्याचा अपंग स्त्री पुरुषांचा निर्धार
आजरा येथे जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा.
आजरा – प्रतिनिधी.
जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आजरा तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ नवनाथ शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ संपत देसाई उपस्थित होते.
सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष मुकुंद नार्वेकर यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. यावेळी बोलताना कॉ संपत देसाई म्हणाले की यावर्षी राज्य शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र्य मंत्रालय सुरु केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो पण केवळ मंत्रालाय झाले म्हणजे अपंगांचे प्रश्न सुटतील असं कांही नाही. अपंगांच्या स्वाभिमानाची आणी आत्मासन्मानाची ही लढाई असून त्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. आम्हाला कोणाची दया किंवा सहानुभूती नको आम्हाला फक्त माणूस म्हणूंन जगण्याचा हक्क हवा. हा हक्कासाठीचा संघर्ष उभा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने अपंग दिन साजरा करणे होय. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ नवनाथ शिंदे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अपंगांसह आपल्याला जगण्याचे मूलभूत अधिकार दिले आहेत.
या अधिकारासाठी संघर्ष आपण एकत्रित संघर्ष करूया. संतांनी रांजल्या गांजल्यांची सेवा हिच खरी ईश सेवा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इथेच मला तुमच्यात देव दिसतो असेही ते म्हणाले. यावेळी सरिता कांबळे, सोनाली रायकर्, निवृत्ति फगरे, गुरुनाथ पाटील, सुशीला होरांबळे, आनंदा गुरव, महादेव बुरुड, शिवाजी चव्हाण, गोपाळ करडे, सुनील सासूलकर, शामराव तारळेकर यांच्यासह अपंग स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते. आभार संतोष सुतार यांनी मानले.