रणधुमाळी उत्तुर ग्रामपंचायत. भाग.- १ – उत्तुर गावात युवा परिवर्तन आघाडीचे. – प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान. ( तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत. – ७ हजार २३९ मतदार. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील उत्तुर गावात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उत्तुर युवा परिवर्तन आघाडीने प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान करत हि भाजप, व अन्य, व युवा वर्ग. एकत्र येत ही आघाडी केली आहे. आजरा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत. असून ७ हजार २३९ मतदार आहेत.
येथील उत्तुर जिल्हा परिषद मधील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कारखाना संचालक वसंतराव धुरे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान जि. प. सदस्य उमेश आपटे हे दोन गट एकत्र येऊन आघाडी केली आहे. १७ सदस्य व एक सरपंच अशी १८ अशी ही होणारी ग्रामपंचायत निवडणूक या निवडणुकीत उत्तुर गावातील सर्व तरुण वर्ग एकत्र असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे तरुणांची संख्या कमी करण्याचे काम युवा परिवर्तन आघाडीने केले आहे.
मागील अनेक वर्षापासून या ग्रामपंचायत व उत्तुर जिल्हा परिषद पंचायत समितीवर या नेतेमंडळींचे वर्चस्व राहिले आहे. यामुळे उत्तुर गावातील तरुणांनी नेत्यांचा झेंडा किती दिवस हाती घ्यायचा. या धर्तीवर तरुण पिढी एकत्र येत ही आघाडी निर्माण केली आहे. परंतु या आघाडीला उत्तुर गावातील नागरिक कितपत साथ देणार युवा पिढीचे नेतृत्व मतदार मान्य करणार की नाही. तरुणांना एक वेळ संधी देऊन उत्तुर गावचा कायापालट करून घेणार की पुन्हा जुन्या जाणकार नेतेमंडळींना संधी देणार हे निकाल नंतर स्पष्ट होईल परंतु माघारी नंतर कोणत्या प्रभागातील कोणता उमेदवार सक्षम आहे. यावर मतदार मतदान करणार आहेत. परंतु येणाऱ्या प्रचार काळात युवा पिढीचे प्रचाराचे मुद्दे काय असणार यावरतीही प्रचाराच्या रणधुमाळीतून स्पष्ट होणार आहे. अशा चर्चा असल्या तरी व गुलदस्त्यात असलेल्या या आघाड्या माघारी नंतरच स्पष्ट होतील. खरे चित्र समोर येईल
युवा परिवर्तन आघाडीचे नेतृत्व संजय धुरे, अतिशकुमार देसाई, धोंडीराम सावंत, योगेश भाईंगडे, प्रविण लोकरे, प्रदिप लोकरे सह युवा परिवर्तन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे.