मडिलगे गावावर हि ग्रामपंचायत निवडणूक लादली गेली. – समझोता करण्यासाठी आमची तयारी होती. माजी सभापती भिकाजी गूरव.
आजरा. – प्रतिनिधी.०२

मडिलगे गावावर हि निवडणूक लादली गेली आमच्या गटाकडून समझोता करण्यासाठी आमची तयारी होती. पण विरोधी आघाडीला समझोता करायचा नव्हता यामुळे गावावर निवडणूक लादली गेली व आता ती वेळ निघून गेली आहे. असे मत माजी सभापती आघाडी प्रमुख भिकाजी गूरव यांनी व्यक्त केले. मडिलगे ता. आजरा येथील ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर भावेश्वरी ग्राम विकास आघाडी वतीने ग्रामदैवत भावेश्वरी नारळ ठेवण्यासाठी शुक्रवार दिनांक. ०२ रोजी आघाडीतील उमेदवार व मतदारांना श्री. गूरव संबोधीत करत होते. पुढे म्हणाले खऱ्या अर्थाने मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी सुरुवात झाली. व गावचा विकास झाला. उर्वरित कामे देखील मार्गी लावू यामुळे गावच्या विकासासाठी आम्ही काम केले आहे. व यापुढे विकास काम करत राहणार. यावेळी सर्व उमेदवाराच्या ओळखी करून दिल्या.
माजी सरपंच शिवाजी गूरव, म्हणाले यापूर्वी आपल्या सर्वांच्या अर्शिविदाने
आपन चांगली व कोणत्याही अमिशाला, दबावाला बळी न पडता सहकार्य केला आहात आम्ही सर्वाचे आभारी अहोत. या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी भावेश्वरी ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार, मतदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी सरपंच, उप. सभापती दिपक देसाई यांनी मानले.

मागील अनेक निवडणुकीत विरोधकांनी चिरक्यावरील पाण्याच्या गळकी टाकी असे म्हणून अपप्रचार केला पण त्या विभागातील आमचे ग्रामस्थ आजही मुबलक पाणी पित. – आहेत. – अप प्रचाराला बळी पडू नका. निवडणुकीचा प्रचार शांततेत करायचा आहे.
भावेश्वरी ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे तीन उमेदवारांचे अर्ज भरले असून अद्याप सरपंच पदाचा उमेदवार निश्चित केलेल्या नसून आघाडीच्या वतीने सर्वानुमते एक उमेदवार निश्चित केला जाणार आहे. यावेळी सर्वांना आघाडीच्या वतीने माहिती देण्यात आली.
