नसरापूर व पुलांची शिरोली येथील तरूणीचे लैंगीक शोषन करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. – उपसभापती सौ. यशोदा पोवार
आजरा.- प्रतिनिधी.

नसरापूर येथील नराधमाला व कोल्हापूर जिल्हातील पुलांची शिरोली येथील तरूणीचे लैंगीक शोषन करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे बाबत. आजरा पंचायत समिती उपसभापती यशोदा पोवार यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे येथील नसरापूर येथे एका ३ वर्षाच्या चिमुरडीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून खून केला ही घटना अत्यंत निदंनीय व लजास्पद आहे. त्याच बरोबर कोल्हापूर जिल्हातील पुलांची शिरोली येथे दोन तरूणांनी जवळ जवळ १० ते १५ तुरूणीवर लैंगीक अत्याचार करून त्यांचे व्हीडीओ मोबाईलवर व्हायरल केले आहेत. ही सुध्दा घटना निदंनिय हिदु धर्मातील मुलीवर अत्याचार करून धार्मिक तिढा निर्माण करणारी आहे. अशा घटना अलीकडे या महाराष्ट्रात वारंवार होत आहेत. हे या छत्रपतीच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. यासाठी या दोन्ही घटनेंतील आरोपी यांचा खटला फास्ट कोर्टात चालवून यांना लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणे करून पुन्हा या महाराष्ट्रातील मुली आणि महिलावर वाईट नजर टाकण्याची हिमंत या नराधमामध्ये होणार नाही. या निवेदनावर उपसभापती सौ पोवार यांची सही आहे.
