राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम – टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान मडिलगेत संपन्न. ( २११ नागरिकांनी घेतला लाभ. )
🛑आजरा महाविद्यालय बँकिंग क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
🟣राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम – टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान मडिलगेत संपन्न. ( २११ नागरिकांनी घेतला लाभ. )
आजरा.- प्रतिनिधी.


आजरा मडिलगे उपकेंद्र येथे
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान मडिलगे येथे संपन्न झाले. या अभियानात २११ नागरिकांनी लाभ घेतला क्षयमुक्त गाव माझी जबाबदारी क्षयरोग प्रसार टाळा, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. क्षण जनजागृती करणे व लोकांचा सहभाग वाढविणे.क्षयरोगाचे लवकर निदान करणे व पूर्ण उपचार देणे क्षयरोग निदानासाठी तपासणीला प्रोत्साहन देणे, क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबास मदत करणे. क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीस तपासणीसाठी प्रवृत्त करणे. क्षयरोगांना ” निक्षय मित्र” मार्फत पोषण आहाराचे सहाय्य करणे सोबत ” जनसेवेचे कार्य महान, टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान ” मडिलगे सरपंच यांच्या उपस्थितीत राबवणे आले. यावेळी सरपंच बापू निऊगरे, ग्रामपंचायत सदस्या, सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्यासह २११ नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला. सदर अभियान राबविण्यासाठी प्रयोगशाळा पर्यवेक्षक काजल देसाई, उपचार पर्यवेक्षक संग्राम पाटील, समुदार आरोग्य अधिकारी अमोल चव्हाण, आरोग्य सेविका विद्या भोसले, दिपाली गोईलकर, आरोग्य सेवक देविदास बोंबले, अशा सेविका सुमन कुंभार, संगीता पाटील, वैशाली, अर्धवेळ परिचर पुजा येसने यांनी या अभिनयासाठी परिश्रम घेतले. या अभिनयासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य नाम. प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण अधिकारी कर्मचारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
🛑आजरा महाविद्यालय बँकिंग क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी.

बारावी बोर्ड परीक्षेत आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाकडील बँकिंग अभ्यासक्रमाची धनश्री केरकर हिने महाविद्यालयात प्रथम तर आजरा केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला. आजरा विभागातील बँकिंग क्षेत्रातील १०० टक्के निकालाची परंपरा कायम
१९९५-९६ पासून आजरा महाविद्यालयात बँकिंग अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमाचा गेली ३० वर्षे १०० टक्के निकाल आहे. चालू वर्षीही या निकालाची परंपरा या अभ्यासक्रमांकडील शिक्षकांनी कायम ठेवली आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. याप्रसंगी सत्कार करताना मनोजकुमार पाटील, सदाशिव मोरे, संदीप देसाई सोबत पालक हितचिंतक.




