Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती कार्यक्रम.

वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती कार्यक्रम.

वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती कार्यक्रम.

आजरा.- प्रतिनिधी.

वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त वनविभाग आजरा यांच्या वतीने व्यंकटराव हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज , आजरा येथे दि. ५ रोजी वन्यजीव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम सचिन सावंत (परीक्षेत्र वन अधिकारी आजरा) यांचे मार्गदर्शनखाली आयोजित केला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य एस. एन. पाटील होते.
यावेळी प्रमुख वक्ते विकास माने, वन्यजीव अभ्यासक व निसर्ग मार्गदर्शक* यांनी “साप, सापांच्या प्रजाती, समज व गैरसमज” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सापांच्या विविध प्रजाती, त्यांची ओळख, सापांविषयी समाजात असलेले गैरसमज तसेच साप आढळल्यास घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच मानद वन्यजीव रक्षक, कोल्हापूर विजय पाटील यांनी “मानव व वन्यजीव संघर्ष” या विषयावर मार्गदर्शन करताना मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे, वन्यजीवांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि वन्यजीव संवर्धनामध्ये नागरिकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास परीक्षेत्र वन अधिकारी आजरा सचिन सावंत तसेच परिमंडळ वन अधिकारी उत्तर आजरा कृष्णा डेळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनपाल उत्तर आजरा कृष्णा डेळेकर यांनी केले. त्यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व सांगताना वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृती आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची गरज स्पष्ट केली.


कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. महादेव पाटील यांनी उपस्थित मान्यवर, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पारळे यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद तसेच वनपरिमंडळ उत्तर आजरा कडील वनरक्षक श्रीमती प्रियांका पाटील, संगीता राठोड, सरिता बावस्कर वनसेवक कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, सुरेश पताडे तसेच वन्यजीव बचाव पथक सदस्य राहुल गवळी, समीर केरकर, साहिल डेळेकर, विनायक पताडे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते. वन्यजीवांविषयी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, सापांविषयीचे गैरसमज दूर करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीबाबत जनजागृती करणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.