HomeUncategorizedवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने नुकताच निर्णय घेवून कारखान्याकडे रू.१५०००/- शेअर्स रक्कम पुर्ण असणा-या अ व ब वर्ग सभासदांना प्रत्येकी 50 किलो साखर, शेअर्स पोटी रु.१००००/- जमा असलेल्या सभासदांना प्रत्येकी २५ किलो तर शेअर्स रक्कम रु.७०००/- जमा असणा-या सभासदांना प्रत्येकी १५ किलो साखर त्याचप्रमाणे कारखान्याच्या सन २०२५/२६ गळीत हंगामात गळीतासाठी ऊस पुरवठा केलेल्या ऊस पुरवठादारांना प्रतिटन अर्धा किलो साखर प्रति किलो रू.२५/- प्रमाणे सवलतीच्या दरात दि. १६/४/२०२६ ते दि. १५/५/२०२६ या कालावधीत वाटप केली जाणार आहे.
पात्र सभासदांनी साखर कार्ड घेणेसाठी व ऊस पुरवठादारांनी टनेज साखर उचल करतांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स त्यावर सही करून देणे अत्यावश्यक आहे.
यामधील सभासद साखर व कार्यक्षेत्रातील टनेज साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाच्या तालुक्यातील संबंधीत शाखा मधुन वाटप केली जाईल तर गेटकेनची गडहिंग्लज, चंदगड, कर्नाटक, आंबोली, गारगोटी मधुन आलेल्या ऊसाची टनेज साखर कारखाना कार्यस्थळावरून वाटप केली जाणार आहे.
आजरा साखर कारखान्याकडे अपुरी शेअर्स रक्कम असलेल्या मंजुर सभासदांची साखर वाटप कालावधीत अपुर्ण शेअर्स रक्कम भरून घेणेची व्यवस्था कारखान्याच्या संबंधित शेती सेंटर ऑफिसमध्ये केलेली आहे. कृपया सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रू.१५०००/- रु.१००००/- किंवा कमीत कमी रू.७०००/- पुर्ण करून कारखान्याचे धोरणाप्रमाणे साखर वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे). शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के. सावंत व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.