Homeकोंकण - ठाणेविरोधी नगरसेवक फक्त विरोध करण्याचे काम करत आहेत. - नगराध्यक्ष अशोक चराटी.(...

विरोधी नगरसेवक फक्त विरोध करण्याचे काम करत आहेत. – नगराध्यक्ष अशोक चराटी.( पत्रकार परिषदेत माहिती.)🛑सुधारित शक्तीपीठ महामार्गाला विरोध – बाधित शेतकऱ्यांचा १५ एप्रिल रोजी व्यापक मेळावा घेणार – ( सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा.)

🟣विरोधी नगरसेवक फक्त विरोध करण्याचे काम करत आहेत. – नगराध्यक्ष अशोक चराटी.
( पत्रकार परिषदेत माहिती.)
🛑सुधारित शक्तीपीठ महामार्गाला विरोध – बाधित शेतकऱ्यांचा १५ एप्रिल रोजी व्यापक मेळावा घेणार – ( सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा.)

💥विरोधी नगरसेवक फक्त विरोध करण्याचे काम करत आहेत. – नगराध्यक्ष अशोक चराटी.
( पत्रकार परिषदेत माहिती.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील नागरिकांनी आमच्या हातात विश्वासाने सत्ता दिली आहे. आजरा शहर स्वच्छ सुंदर , नळपाणी योजनेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आम्ही काम करत असताना विरोधक मात्र विरोध करत काम करु नये अशी त्यांची इच्छा आहे. याबाबत आजरा नगरपंचायत येथे नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला माहिती देताना नगराध्यक्ष श्री चराटी म्हणाले
खरंतर चुकीच्या गोष्टीला विरोध करणे योग्य आहे. पण चांगल्या कामासाठी विरोध कशासाठी काही कामात तृटी आहेत. त्या पुर्ण होतील पण काही विरोधी नगरसेवक नाम. प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन देऊन राजकारण करत आहेत.
विरोध हा निवडणूक अगोदर पण आपण निवडून आले नंतर सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असताना विरोधक फक्त विरोध करुन काय सिद्ध करत आहेत. सद्यस्थितीत आरोग्य विभागाच्या स्थिती बाबत नाम. प्रकाश आबिटकर यांना कल्पना दिली आहे. कचऱ्याचा विषय जवळपास संपुष्टात बाप टंआला आहे. विरोधक फक्त फोटो काढूठफन चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी करत आहेत. स्वच्छतागृहासाठी सात कोटी वफ कचऱ्यापासून खत व बायोगॅस करण्याची संकल्पना आहे. आम्ही सत्ताधारी असं काही नाही. सर्वांनी एकत्र आजरा शहराचा विकास साठी काम केले पाहिजे. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करणार पाण्याचा प्रश्न ८०% पूर्ण होणार आहे आजरा शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे विनाकारण विकासात भांडण निर्माण करणे रस्ते विकास कामाची मंजुरी आम्ही आणून रस्ते करत आहोत व आजरा शहराचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष यांना उद्घाटन करताना कल्पना सुद्धा दिली जाते. अधिकारी यांना दमदाटी करून बदली करण्याची धमकी दिली जाते. अशा चुकीच्या गोष्टींनी विकास कामे थांबणार नाहीत आमचे सर्व नगरसेवक खंबीर आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला आहे आम्ही पटकन कोणतेही विकास काम करू शकतो. परंतु आमची इतकी इच्छा सर्वांनी एकत्र राहून विकास काम करूया असे बोलताना श्री. चराटी बोलताना म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेविका अश्विनी चव्हाण, निशांत चांद, अन्वी केसरकर, नगरसेवक परेश पोतदार, सह सत्ताधारी गटाचे नगरसेवक व नगरसेविका, गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

🛑सुधारित शक्तीपीठ महामार्गाला विरोध – बाधित शेतकऱ्यांचा १५ एप्रिल रोजी व्यापक मेळावा घेणार – ( सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा.)

आजरा.- प्रतिनिधी.

कोणतीही मागणी नसताना नव्याने होणारा शक्तिपीठ महामार्ग याला विरोध करणेबाबत आजरा येथे सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना शिवसेना ( उबाठा ) जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले. परवार ते पात्रादेवी पहिला मार्ग बदलून सुधारित शक्तीपीठ मार्गाला सरकारने मंजुरी दिली. या शक्तिपीठ मार्गाला विरोध करणे गरजेचे आहे. कारण सामान्य माणूस या महामार्गावर जाऊ शकत नाही शेती व घर विभागले जाणार आहे. भौतिक विविध टिकणार नाही. विधानसभा निवडणुकीत नाम. मुश्रीफ यांनी जिल्ह्यात शक्तिपीठ येऊ देणार नाही. असे आश्वासन दिले होते. यामुळे दिलेल्या आश्वासनाचे काय झाले. मागणी व गरज नसताना शेती व निसर्ग का उध्वस्त करत आहात. असे बोलताना श्री शिंत्रे म्हणाले.
यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले
शासनाने शक्तिपीठाला वाढता विरोध होत असताना सुधारित शक्तिपीठाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाली सातारा कोल्हापूर, पन्हाळा, राधानगरी, आजरा असा हा आजरा मार्गे चंदगडकडे जाणारा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांची मागणी नसताना लादला जात आहे. या मार्गाला बाधित शेतकऱ्यांचा सह वृक्षप्रेमी नागरिक यांचा संघर्षाचा लढ्याला आजरा तालुक्यातील सुरुवात होणार आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी जाणार आहेत. शेती हा शाश्वत जगण्याचा मार्ग पर्यावरण आरोग्यदायी पर्यावरण उध्वस्त होणार जागतिक तापमान वाढीचा परिणाम होणार आहे. लोकाभिमुख पर्यावरण संस्कृती उध्वस्त होणार. शेती पर्यावरण व संस्कृती उध्वस्त होऊ नये यासाठी शक्तिपीठाला विरोध हा कायम असणार सरकार धार्मिक भावनेला हात घालून रस्ते करण्याचा घाट घालत आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम घाट उध्वस्त झाला तर महाराष्ट्र उध्वस्त होईल. यामुळे पक्ष संघटना बाजूला ठेवून पर्यावरण व संस्कृती जपण्यासाठी १५ एप्रिल रोजी हा लढा देऊया असे बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले.
यावेळी शेतकरी संघटनेचे ता. अध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले आग्रा तालुक्यातील देवडे पासून या लढ्याची सुरुवात होणार आहे. शक्ती पिठाची मागणी नसताना देवाच्या, भक्तांच्या, व त्यांच्या मोठ्या उद्योजकांसाठी देवा भाऊंनी मागणी नसताना महामार्गाला मंजुरी दिली आहे.
पश्चिम भागातील शेती नष्ट होणार आहे भरावयाचे पाणी डोंगरावरून पाणी घेऊन शेती जमीन वस्तू होणार आहे. चंदगड तालुक्यातील आमदारांच्या वतीने मागणी होते. सद्यस्थितीत राज्यातील नवा संघर्ष आहे. याला विरोध म्हणून बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शक्तिपीठ संघर्ष विरोधी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेत काँ. संजय तरर्डेकर., उबाठा ता. प्रमुख युवराज पोवार, संजय सावंत प्रकाश मोरस्कर, डॉ. धनाजी राणे, रवींद्र भाटले, सह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.