Homeकोंकण - ठाणेजनता गृहतारणच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ - चेअरमन मारुती मोरे.

जनता गृहतारणच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ – चेअरमन मारुती मोरे.

जनता गृहतारणच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ – चेअरमन मारुती मोरे.

आजरा.- प्रतिनिधी.


संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेने ऑक्टोबर २०२६ अखेर १३५ कोटी रुपयांच्या ठेवींचे संकलन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या वेतनात 12 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचे जीवनमान उंचावेल आणि संस्थेच्या प्रगतीला आणखी गती मिळेल, असा विश्वास चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केला.
संस्थेमार्फत दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांना नियमित वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र, यंदा संस्थेने कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेऊन संचालक मंडळाने विशेष वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट झाले.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक बळ वाढण्यासोबतच त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्यास मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये काम करण्याची नवी ऊर्जा निर्माण करणे आणि संस्थेच्या विकासात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे चेअरमन मोरे यांनी सांगितले.
यावेळी आभार मानताना संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर म्हणाले की, संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. तसेच ग्रॅच्युइटी, दिवाळी बोनस, कर्मचारी विमा, दैनिक भत्ता आणि घरभाडे भत्ता अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेमार्फत सातत्याने सकारात्मक निर्णय घेतले जात असून, यंदाची विशेष वेतनवाढ हा त्याचाच एक भाग आहे.
यावेळी संस्थेचे संचालक प्रा. रवींद्र आजगेकर, इंजि. प्रदीप मोरे,. कृष्णा डेळेकर, श्री. युवराज शेटके, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी सौरभ नांदवडेकर व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.