Home Uncategorized संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : सभापती यशोदा...

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : सभापती यशोदा पोवार.🟣बँका व पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी जबरी करू नये.( शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तहसीलदारांकडे मागणी.)

🟣संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : सभापती यशोदा पोवार.
🟣बँका व पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी जबरी करू नये.
( शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तहसीलदारांकडे मागणी.)

🟡संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : सभापती यशोदा पोवार.

आजरा : प्रतिनिधी.

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये आजरा तालुक्याचाही समावेश असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व योग्य प्रमाणात करावा. शेतीपंपातून पाणी वाया जाऊ देऊ नये, तसेच ग्रामपंचायतींनी एक-दोन दिवसांच्या अंतराने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती यशोदा पोवार यांनी केले.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. ५ रोजी पंचायत समिती आजरा येथे जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी स्वागत केले
.

बैठकीत पाटबंधारे, वन, कृषी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभागाचे आजरा पाटबंधारे शाखेचे अधिकारी अजिंक्य आबिटकर यांनी उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाईबाबत माहिती दिली.
कृषी विभागाच्या वतीने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. हे बियाणे शेतात लागवड करण्याची हमी देणाऱ्या शेतकऱ्यांनाच वितरित करण्यात येणार असून, कृषी विभागाकडून त्याची पाहणी केली जाणार आहे. वन विभागाच्या वतीनेही विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी साहाय्य गट विकास अधिकारी श्री शेठे, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, जलसंपदा विभागाचे श्री कोकितकर, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार सह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

💥जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई म्हणाले .

उत्तूर व पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महावितरणची काही कामे ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्याने थांबली आहेत. केंद्र व राज्य शासनाने संबंधित ठेकेदारांची बिले अदा करून प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे. नव्याने होणारी ऊस लागवड तूर्तास थांबवून पाणी उपलब्धतेचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

🟡बँका व पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी जबरी करू नये.
( शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तहसीलदारांकडे मागणी.)

आजरा :- प्रतिनिधी.

चालू वर्षी तालुक्यामध्ये अल निनो या वादळामुळे पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके करपून वाळून गेली. यामुळे या वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले आहे.

यातच तालुक्यातील बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्था या कर्जफेडण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यादीमध्ये आजरा तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांनी, पतसंस्था व फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीची जबरदस्ती करू नये व चालू आर्थिक वर्षाचे व्याज माफ करावे, अशी सूचना आपल्याकडून करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार, आजरा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील ता प्रमुख युवराज पोवार सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.