HomeUncategorizedमडिलगेकरांची मागणी - बिबट्यासह वण्य प्राण्याचा बंदोबस्त करा.- अन्यथा वन विभागवर मोर्चा.

मडिलगेकरांची मागणी – बिबट्यासह वण्य प्राण्याचा बंदोबस्त करा.- अन्यथा वन विभागवर मोर्चा.

मडिलगेकरांची मागणी – बिबट्यासह वण्य प्राण्याचा बंदोबस्त करा.- अन्यथा वन विभागवर मोर्चा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील मडिलगे गावात दि. १२ रोजी पहाटेच्या सुमारास बाळू पुंडलिक हरळकर मडिलगे येथील पायरीकडील शेतात वन्य प्राण्याकडून हल्ला करून दोन कुत्री ठार केली. तर एक कुत्र्याला जखमी केले. यामध्ये बिबट्यानेच ठार केले असल्याचा संशय असल्याचे शेतकऱ्यांच्या कडून माहिती समजते. मडिलगे ता. आजरा पायरी नावाच्या बाळु हरळकर यांचा गोठा असून या गोठ्यात बैले, म्हशी, शेळी अशी जनावरे आहेत. जनावरांच्या व शेताच्या रखवालीसाठी बाळू हरळकर यांनी दोन कुत्री पाळली होती. काल रात्री जनावरांना वैरण पाणी देऊन ते आपल्या घरी मडिलगे येथे आले. त्यानंतर आज पहाटे जनवारांना वैरण पाणीसाठी व दुध काढण्यासाठी गेले असता दोन्ही कुत्र्यापैकी एक कुत्रा बिबट्याने हल्ला करून अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला तर त्यातील दुसरा कुत्रा गायब असल्याचे समजते सदर कुत्र्या वरील हल्ला बिबट्याने केला असल्याचा संशय आहे. तर बाळू भाईगडे यांच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याला किरकोळ जखमी केले आहे.

याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती घेऊन माहिती देतो असे वनविभाने सांगितले संशयित बिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी व गावकाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कोणत्या प्राण्याने हल्ला केला. असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी शेत पिकाची नुकसान व कुत्रे माणसावर असे पुन्हा हल्ले होऊ नये याचा बंदोबस्त वन विभागणी करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.