मतदारांनी आपली मतदार नोंदणी सह विविध बदल.- संबधित केद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.- आजरा तहसीलदार समीर माने.
आजरा.- प्रतिनिधी.
भारत निवडणूक आयोगाने दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. आजरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी दि ६ ऑगस्ट २०२४ ते दि.२० ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. तसेच दि. १० ऑगस्ट (शनिवार) व दि. ११ ऑगस्ट २०२४ (रविवार) व दि १७ ऑगष्ट २०२४ व दि १८ ऑगष्ट २०२४ या दिवशी आजरा मतदारसंघातील सर्व ग्रामपचायत कार्यालय/तलाठी कार्यालय / जि प शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीबाबत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यापैकी दि. १०ऑगस्ट (शनिवार) व दि. १७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) रोजी आजरा तालुक्यामधील सर्व महाविदयालयामध्ये विशेष शिबीराचे आयोजन करणेत आलेला आहे. सर्व मतदारांनी आपली मतदार नोंदणी व नावात दुरुस्ती, पत्यामध्ये बदल अशा प्रकारचे अर्ज संबधित केद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार आजरा समीर माने यांनी केले आहे.