आंवडी वसाहतीला वाली कोण .- आजरा नगरपंचायतला अधिकृत नोंद नाही. – नागरिकांची व्यथा.( वसाहतीतील नागरिकांची पत्रकार परिषदेत माहिती.)
आजरा.- प्रतिनिधी.
आंवडी वसाहतीला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजरा नगरपंचायतला अधिकृत नोंद नाही. याबाबत आंवडी वसाहती मधील नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आजरा नगरपंचायतला घरपट्टी – पाणीपट्टी देतो पण शासकीय सर्व अधिकारी एकमेकांच्या बोटं करून सी. टी कार्यालयाकडे तुमची नोंद नसल्याची कारणे देत आहेत. परंतु मुळात चित्री प्रकल्पातील धरणग्रस्तांना आंवडी वसाहतीतील गट नं २५२ मध्ये १७/३/१९५८ रोजी ताबा दिला.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या आदेशाने कब्जा दिला त्यावेळी मंडळ अधिकारी संबंधित विभागाने माहिती पाठवावी व नोंद करून आपला अहवाल द्यावा हा आदेश डावलला व याची दप्तरी नोंद नाही. व सिटी सर्वे झाला नाही. फक्त नागरी सुविधा म्हणून आजरा नगरपंचायत कडे आवंडी वसाहत नोंद नसल्याचे अधिकारी सांगतात. घरभाडे पाणीपट्टी आजरा नगरपंचायत घेते मागील अनेक वर्षापासून आम्हाला कोण वाली नाही स्वछा – पुनर्वसन याबाबत कोर्टात केस सुरू आहेत. अनेक दिवसापासून वाढीव गावठाण मागणी करताना २०२४ मध्ये देता येत नाही म्हणून सांगितले. असे मतदान आजरा नगरपंचायत मध्ये आहे. आमच्या प्रभाग १७ मधून लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे. अधिकृत आम्ही नाही आंवडी ग्रामपंचायतीचे आहोत किंवा आजरा नगरपंचायतचे मग आम्ही कोणाचे या वसाहतीमध्ये ५१० लोकसंख्या आहे तर ३७० मतदान आहे. याबाबत येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व पुढील पिढीसाठी हा लढा लवकरच सुरू करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले या पत्रकार परिषदेला आप्पासाहेब पाटील, रामचंद्र मांगले, संतोष चौगुले, रघुनाथ ठिकारे, अमोल गावडे सह नागरिक उपस्थित होते.
