🛑जिल्हा परिषद साठी ८ उमेदवार पंचायत समिती एकूण १८ उमेदवार.. माघार उमेदवारानंतर निवडणुकीच्या रणांगणातील उमेदवारांची यादी पहा.
🟣मडिलगेत उत्तुर जि. प, पं. भादवण स. निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळावा.
( कागल विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदार संघातील नाम. हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास कामाला संधी. – काशिनाथ तेली. )
🛑नागरी सुविधांची कामे पूर्ण झाल्याने धरणातून पाणी सोडू न देण्याचा सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णय.
🛑जिल्हा परिषद साठी ८ उमेदवार पंचायत समिती एकूण १८ उमेदवार.. माघार उमेदवारानंतर निवडणुकीच्या रणांगणातील उमेदवारांची यादी पहा.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. २७ रोजी अर्ज माघारीनंतर पेरणोली गटासाठी पाच उमेदवार, उत्तुर गटासाठी तीन उमेदवार असे
जि. प. निवडणुकीसाठी एकूण ८ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तूर गण पाच उमेदवार, भादवण गण तीन उमेदवार, पेरणोली गण पाच उमेदवार, वाटंगी गण पाच उमेदवार असे पंचायत समिती साठी एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळी चे चित्र स्पष्ट झाले आहे.
🟣माघारी नंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार असे .
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस, संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष
🟣पंचायत समिती भादवण मतदार संघ :-
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष
पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भाजपा
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष
पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष
जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष
जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष असे उमेदवार आहेत.
🟣मडिलगेत उत्तुर जि. प, पं. भादवण स. निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळावा.
( कागल विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदार संघातील नाम. हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास कामाला संधी.)
आजरा.- प्रतिनिधी. दि. २७

कागल विधानसभा मतदारसंघातील व आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा. परिषद. व भादवण पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मडिलगेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते. स्वागत व प्रास्ताविक सरपंच बापू निऊगरे यांनी केले.
यावेळी बोलताना सरपंच श्री. निऊगरे म्हणाले राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणतेही उमेदवार आयात केलेले नाहीत. गावच्या विकासासाठी ना. हसन मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. गावातील पानंद रस्ते होत आहेत.
एकदा पानंद व अंतर्गत रस्ते झाल्यानंतर खडी करण डांबरीकरण करता येते, यामुळे शेतकऱ्यांना शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी रस्ता होऊन शेताचा विकास होणार आहे. रामलिंग परिसराला “क” वर्ग दर्जा, स्मशानभूमीचे रस्ते व काम , विद्युत प्रवाहाचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष भेदभाव न करता गावातील विकासासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून कामे केली आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे उमेदवार शिरिष देसाई व भादवण पंचायत समीतीचे उमेदवार सौ. जयश्री गाडे (कदम) यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन सरपंच श्री. निऊगरे यांनी केले.


यावेळी माजी सभापती भिकाजी गूरव म्हणाले गावचा विस्तार वाढला असल्याने विकास कामे संपत नाहीत. विकास कामे जोरदार सुरू आहेत. या विभागातील दोन्ही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा अभ्यास आहे. म्हणून आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे माजी सभापती श्री गुरव म्हणाले

माजी उपसभापती कारखाना संचालक दिपक देसाई म्हणाले पंचायत समिती उपसभापती व राष्ट्रवादी पक्षाचे काम चांगल्या प्रकारे उमेदवार शिरिष देसाई यांनी केले व उमेदवार सौ. गाडे यांच्या कुटुंबातील सर्वांनी विविध प्रकारच्या योजना लाभार्थी यांना लाभ मंजूर करून दिला आहे. मडिलगे गावातील उमेदवारी मिळाली नाही. व ती आमच्यामुळे मिळाली नाही. हा अपप्रचार चुकीचा आहे. गावात उमेदवारी मिळाली असती तर आम्ही देखील त्या उमेदवारांसाठी काम केले असते परंतु उमेदवारी मिळाली नाही.. याबाबत आमचा समंध नसल्याचे श्री देसाई म्हणाले. परंतु या दोन्ही उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आपण प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले
विकासासाठी.- नाम. श्री मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील उमेदवारांना विजय करा.- नाम. श्री. आबिटकर यांचा हा मतदारसंघ नाही.- काशिनाथ तेली.
यावेळी काशिनाथ तेली म्हणाले आपलं मत विकासासाठी पाहिजे यासाठी या उत्तुर जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना का? मतदान करावे तर उमेदवारांना नाम. प्रकाश आबिटकर यांचा उमेदवार निवडून येऊन उपयोग नाही. हा मतदारसंघ कागल विधानसभा आहे. नाम. हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी जि. प. उमेदवार शिरीष देसाई म्हणाले उत्तुर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात १४ गावे जोडली आहेत. वेळ कमी आहे. पक्ष संघटना मोठी असते पक्षाचा आदेश पाळावा व आम्हा दोन्ही उमेदवारांना विजयी करावे असे श्री देसाई म्हणाले.
यावेळी भादवण पं. स. उमेदवार सौ. जयश्री गाडे, तसेच एम. के. देसाई, विजय वागणेकर, राजु मुरुकटे, संजय गाडे, उपसरपंच पांडुरंग निऊगरे, भिवा जाधव, मारुती घोरपडे, संदिप पोवार, गोविंद निऊगरे, भावेश्वरी संस्था समूहाचे सर्व संचालक सदस्य राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑नागरी सुविधांची कामे पूर्ण झाल्याने धरणातून पाणी सोडू न देण्याचा सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णय.
आजरा – प्रतिनिधी.
सर्फनाला प्रकल्पाच्या नवीन वसाहतीत अजूनही नागरी सुविधांची कामे अपुरे आहेत. गेले अनेक दिवस याबाबत अर्ज विनंती करूनही पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजाने लाभक्षेत्रात धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड संपत देसाई होते.
सर्फनाला प्रकल्पाच्या शेळप येथील प्रकल्पग्रस्त वसाहतीला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही गेले कित्येक दिवस याबाबत लोकांनी अर्ज विनंती केल्या. कारखान्याची मळी नदी सोडली जाते ती प्रकल्पग्रस्त वसाहतीच्या जॅकवेलमध्ये मिसळते. त्यामुळे वसाहतीतील लोकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे यासाठी वारंवार पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे पण त्याकडे पाटबंधारे खात्याने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
याबरोबरच वसाहतीतील गटर, रस्ते, बस थांबा, स्ट्रीट लाईट, स्मशानशेड ही कामे थांबले आहेत. प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात वाटप झालेल्या जमिनीचे सपाटीकरण अजून राहिले आहे. वरील सर्व कामे होत नसल्याने आज शेळप वसाहतीत झालेल्या बैठकीत सर्पनाला प्रकल्पातून लाभक्षेत्रात पाणी सोडू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कॉम्रेड संपत देसाई अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे,अमरसिंग ढोकरे यांच्यासह कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


