🛑चोरटे ताब्यात.- कब्जातून चोरीच्या १,३२२ मीटर केबल व इतर साहीत्य ( एकुण १,४३,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.)
🟣बाबा आढावांचा चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाने हीच खरी श्रद्धांजली… आजऱ्यात श्रद्धांजली सभेत अनेकांनी व्यक्त केल्या भावना.
⭕चोरटे ताब्यात.- कब्जातून चोरीच्या १,३२२ मीटर केबल व इतर साहीत्य ( एकुण १,४३,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

चोरट्यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातून चोरीच्या १,३२२ मीटर केबल व इतर साहीत्य
असा एकुण १,४३,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच दुय्यम अधिकारी यांना गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक चोरीच्या गुन्ह्याना भेटी देवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने समांतर तपास करीत असताना पथकांतील अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत, गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३८५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद मछले रा. राजारामपुरी, कोल्हापूर याने, त्याचे साथीदारासह मिळून केला असून तो व त्याचे साथीदार असे गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालासह एका रिक्षातून उजळाईवाडी, ता. करवीर गावचे हद्दीतील भारती विद्यापीठकडुन पुणे बंगलोर हायवेस मिळणाऱ्या रोडवर येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.

मिळाले बातमीचे अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथकाने दिनांक ०८/१२/२०२५ रोजी उजळाईवाडी, ता. करवीर गावचे हद्दीतील भारती विद्यापीठकडुन पुणे बंगलोर हायवेस मिळणाऱ्या रोडचे कॉर्नरवर सापळा लावून आरोपी १) विनोद बाबुजी मछले व.व. ४६, रा. कंजारभाट वसाहत, मोतीनगर, राजारामपुरी, कोल्हापूर, २) शुभम जयसिंग बागडे व.व. २७, रा. गणेशनगर, फुलेवाडी, कोल्हापूर, ३) चेतन कोंडीराम लोंढे व.व.१९, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३८५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील १,३२२ मीटर केबल व गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची रिक्षा नं. एम. एच.०९ ईल ६४६७ व विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट एक असा एकुण १,४३,४००/-रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून त्यांनी व त्यांचा साथीदार ४) साहील सुरेश पांडागळे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर अश्यांनी मिळून सदरचा गुन्ह्या केले असलेचे सांगितले आहे. आरोपी यांनाजप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईकामी गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहीत मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांनी केली आहे.
🟣बाबा आढावांचा चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाने हीच खरी श्रद्धांजली… आजऱ्यात श्रद्धांजली सभेत अनेकांनी व्यक्त केल्या भावना.
आजरा – प्रतिनिधी

बाबा आढावांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची अपरिमित हानी झाली असून त्यांनी घालून दिलेला चळवळीचा वारसा जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत डॉ नवनाथ शिंदे यांनी आज आजरा येथे डॉ बाबा आढाव यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी, कॉ संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील, तानाजी देसाई, प्रा मीना मंगळूरकर, कॉ संजय तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की बाबा म्हणजे एक कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी समर्पित आयुष्य जगलेले झंझावात होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सत्यशोधक विचार कृतीत आणला. जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी म्हणाले की माझा प्रत्यक्ष आयुश्यात बाबांशी कधी संपर्क आला नाही, पण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेले काम यातून मला बाबा आढाव समजत गेले. आता अशी माणसं राहिली नाहीत ती आपल्यासाठी दिशादर्शक होती.
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई म्हणाले की बाबा हे समाजवादी असले तरी ते सत्यशोधक होते. आयुष्यभर सत्यशोधक विचार त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले की बाबांनी श्रमिक कष्टकरी काच पत्रा वेचणाऱ्या स्त्रियांसह हमालाना संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला. आजही श्रमिकांचे शोषितांचे प्रश्न संपलेले नाहीत. ते घेऊन लढणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली असेल.
कॉ संजय तर्डेकर म्हणाले बाबांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांचं जाणं आम्हाला पोरकं करणार आहे. कॉम्रेड दशरथ घुरे म्हणाले आज सत्यशोधक विचार कृतीत आणून तसा व्यवहार करण्याची गरज आहे, जे बाबांनी केले.
भाकपा माले चे जिल्हाध्यक्ष कॉ शांताराम पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की बाबांनी सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले आहे. तो वारसा आपण जपुया. सकाळचे पत्रकार रणजित कालेकर म्हणाले की आज सकाळ त वर्तमानपत्राचा जो वैचारिक विकास झाला आहे त्यामध्ये डॉ बाबा आढाव यांचा वाटा महत्वाचा राहिला आहे. शिवाजी गुरव, निवृत्ती कांबळे यांनीही आपल्या श्रद्धांजली पर कृतज्ञता व्यक्त केल्या.
यावेळी विक्रम देसाई, रवींद्र भाटले, राजू होलम, प्रकाश शेटगे, जोतिबा चाळके, संजय घाटगे, जानबा मिसाळ, पुष्पलता घोळसे, मारुती चव्हाण, नारायण भडांगे, कृष्णा सावंत, सुनील पाटील यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
