🛑प्राथमिक आरोग्य केंद्र मलीग्रे येथे १६ मे डेंग्यू दिन साजरा.
🛑हत्तीचा बंदोबस्त करुन तात्काळ नुकसान भरपाई शिवसेनेची निवेदनाने मागणी.
आजरा .- प्रतिनिधी.

प्राथमिक आरोग्य केंद्र मलीग्रे येथे १६ मे डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र मालिग्रे अंतर्गत २८ गावे व वाड्या आठ उपकेंद्रामध्ये विस्तारले असून या आठ उपकेंद्रांतर्गत डेंग्यू विषयी जनजागृती , गप्पी मासे सोडणे,गावामध्ये डेंग्यू चिकुनमलेरिया, चिकून गुण्या, जलजन्य आजार, कीटकजन्य आजार, वायुजन्य आजार विषयी प्रत्येक गावामध्ये जनजागृती करण्यातआली यामध्ये ,कंटेनर सर्वे,डबके बुजवणे, अतिरिक्त पाणी साठे असतील तर ते झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, याविषयी संपूर्ण जनजागृती जनतेमध्ये केली. तसेच पावसाळ्या अगोदर घ्यावयाची खबरदारी व पावसाळ्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी स्लोगन व म्हणी बोर्ड दाखवून जनतेमध्ये जनजागृती केली केली. कार्यक्रमा विषयी उपकेंद्र मालिग्रे,कानोली,किणे, कोळींद्रे सुळे, हत्तीवडे मेंडोली चितळे, येथील cho,आरोग्य सेवक सेवि कांनी कष्ट घेतले व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला कार्यक्रमाचे पार पाडण्यासाठी डॉ. .के. के. काझी. प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे यांनी विशेष मार्गदर्शन केले,डेंग्यू विषयी ओपिडीला आलेल्या पेशंटना मार्गदर्शन व डेंग्यूसाठी पावसाळ्या डबकी बुजविणे, अतिरिक्त पाणी साठे न ठेवता, लागेल तेवढेच पाणी वापरा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, व्हेंट पाईपला जाळी बसवा, घरासमोर डबकीसाठू देऊ नका, नारळाच्या करवंट्या, फुटक्या बादल्या, टायर, ई टाकाऊ वस्तूची विल्हेवाट कशी लावावी व आपण डेंग्यू मुक्तगाव करणे विषयी विशेष मार्गदर्शन केले.
🛑हत्तीचा बंदोबस्त करुन तात्काळ नुकसान भरपाई शिवसेनेची निवेदनाने मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका उभाठा शिवसेनेच्या वतीने आजरा वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्यातील मसोली व परिसरात हत्तीचा वावर आहे. कांही दिवसापूर्वी मसोली, ता. आजरा येथे हत्तीने ट्रॅक्टर व शेतीतील भुईमूग व पाण्याची पाईपलाईन इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी व गावातील नागरिक या नुकसानीमुळे त्रस्त झालेले आहेत. तरी तात्काळ तेथील नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर त्यांना नुकसानीची रक्कम द्यावी तसेच हत्ती व गवे यांच्या बंदोबस्तासाठी उपाय करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच वन विभागाच्या कार्यालय नजीक आजरा – गडहिंग्लज रोडवर मागील चार दिवसापूर्वी गवा रेड्याने चालत्या गाडीला जोराची धडक दिली आहे. या ठिकाणी नागरिकांना प्रवाशांना वन्य प्राण्यापासून धोका होऊ नये यासाठी योग्य तो तारेचे कुंपण करून बंदोबस्त करावा अशी ही मागणी या निवेदनात केली आहे अन्यथा आपल्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, सह अक्षय कांबळे, पदाधिकारी व शिवसैनिकांच्या यांच्या सह्या आहेत.