🔘अर्जंट भरती🔘 चांगले वेतन राहण्याची सोय..
🛑अधिकाऱ्यांच्या पाटीवर झळकले आईचे नाव.
🛑मडिलगेत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत. – स्वामी समर्थ अक्कलकोट पादुका दर्शन सोहळा संपन्न.
सांगली :- प्रतिनिधी.

राज्य शासनाने शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पाटीवर त्यांच्या आईचे नाव हे झळकू लागले आहे.
🛑पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी निवास, कार्यालयाबाहेर लावलेल्या पाटीवर आईच्या नावाचाही उल्लेख केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने ११ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला.त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून करण्याचे ठरले. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सर्व कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतनचिठ्ठी, सेवापुस्तिका, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने आदी शासकीय दस्तऐवजात आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यास मान्यता दिली आहे.
🟥बालकांच्या नावाबाबत सूचना नाहीत
या निर्णयानुसार १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या आधी आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला जन्म-मृत्यू नोंदवहीत सुधारणा करावी लागणार आहे.शासनाकडून अद्याप कोणतेही परिपत्रक आलेले नाही. ते आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना याबाबतची सूचना दिली जाणार आहे. त्यानंतर रुग्णालयाकडून नवजात बालकाची जन्म नोंद करताना आईच्या नावासह जन्म-मृत्यू विभागाला माहिती दिली जाणार आहे. कागदपत्रांवर आधी बालकाचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे लावण्यात येईल.
🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून सुरवात
निर्णयाची अमंलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून केली आहे. त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पाटीवर आईचे नाव लावले आहे.
🛑अर्जंट भरती राहण्याची सोय.. चांगले वेतन.

“पुण्यातील नामांकित LG & TATA कंपनीमध्ये गरजु विद्यार्थ्यांची अनुभवी व विनाअनुभवी मुलांची त्वरीत भरती चालू आहे.”
पगार :- 16000 ते% 60000
शिक्षणाची अट नाही.
शिक्षण – १०वी ते १२वी
पगार – 15500
जागा – 327
शिक्षण - I.T.I/
पगार - 16200
जागा – 131
शिक्षण - Diploma
पगार - 17500
जागा – 94
शिक्षण - Any degree
पगार - *20000*
जागा - 177
एका दिवसात जाॅयनिंग.
१०० % जॉब.
भरती कालावधी=18 मे 2024 ते 5 जून 2024 पर्यंत.
गरजू मुलांना प्राधान्य.
बाहेरगावातील मुलांची जेवणाची + राहण्याची + नाश्ट्याची सोय फ्रि.
📱संपर्क –
7400282041
✅(फक्त गरजूंनीच call करावा.)
✒टिप – आपली एक शेअर आपल्या मित्राला (भावाला )
नोकरी ( job) मिळवुन देऊ शकतो
🛑मडिलगेत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत. – स्वामी समर्थ अक्कलकोट पादुका दर्शन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
।। श्री स्वामी समर्थ।।

मडिलगे ता. आजरा येधे हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ अक्कलकोट पादुका दर्शन दि. १६ रोजी संपन्न झाला. मडिलगे गावातील व परिसरातील सर्व ग्रामस्थ स्वामी भक्तांना दि १५ रोजी बुधवारी अक्कलकोट येथुन श्री स्वामी समर्थ समाधी मठ मूळस्थान अक्कलकोट येथुन महाराजांच्या मुळ पादुका अनिकेत कवळेकर यांचे घरी आगमन होईल.दि.१६ गुरुवारी रोजी सकाळी परम स्वामी भक्त श्री चोळाप्पा महाराज यांचे वंशज वेदमूर्ती परम पूज्य नितीन महाराज प्रभाकर पुजारी व ब्रम्हवृंद यांच्या वेदमंत्राने अभिषेक, नैवद्य,आरती संपन्न होईल. या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंडळ मडिलगे यांनी केले या सोहळ्यासाठी सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत दिंडीने श्रींची भव्य मिरवणूक मडिलगे बस स्थानक ते भावेश्वरी मंदिर भव्य मिरवणूक काढत पादुका दर्शनासाठी भावेश्वरी मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या. मंदिरामध्ये पादुका पूजन व भजन कीर्तनाच्या गजरात विधी संपन्न झाला गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी पादुकांचे दर्शन घेतले. यांनतर महाआरती व नंतर चुलबंद महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व भाविक भक्तांनी व परिसरातील भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी देवस्थान समिती मडिलगे, गावातील तरुण मंडळ, नागरिक, महिला वर्ग यांचे सहकार्य लाभले.