🛑टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा.- केएल राहुलला धक्का.
🟥चौघांचे कमबॅक
अहमदाबाद :- प्रतिनिधी.
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला. अहमदाबादमध्ये बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांचा संघ जाहीर झाला. यामध्ये ऋषभ पंतचं पुनरागमन झालं आहे. तर केएल राहुलला मोठा धक्का बसला असून त्याला टी२० वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलं आहे. ऋषभ पंतसोबत शिवम दुबे, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचं पुनरागमन झालं आहे.
🟥टी२० वर्ल्ड कपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. १ जून ते २९ जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून त्यात ४ खेळाडू स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. यात शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश आहे.
🔴बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासह निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांची अहमदाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीत संघातील खेळाडूंच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं. बैठकीआधी अजित आगरकर दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मुंबई इंडियन्सच्या सामन्यावेळी स्टेडियममध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.
🟥भारतीय संघ पुढीलप्रमाणे-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
🛑राखीव खेळाडू :-शुभमन गिल, रिंकु सिंग, खलील अहमद, आवेश खान.