Homeकोंकण - ठाणेउष्मालाटेची शक्यता.- बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.- रत्नागिरी उपजिल्हाधिकारी.‌🛑कट्टर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली...

उष्मालाटेची शक्यता.- बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.- रत्नागिरी उपजिल्हाधिकारी.‌🛑कट्टर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक.

🛑उष्मालाटेची शक्यता.- बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.- रत्नागिरी उपजिल्हाधिकारी.‌
🛑कट्टर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक.

रत्नागिरी :- प्रतिनिधी

प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. 22 एप्रिल ते दि. 26 एप्रिल 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

🟥काय करावे-

पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

🔴काय करू नये-

उन्हात अती कष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

🛑कट्टर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक.

गडचिराेली :- प्रतिनिधी.‌

नक्षलवादी कारवायात सामील असणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना इतर प्रकारची मदत करणाऱ्या कट्टर समर्थकास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप मोतीराम पेंदाम (वय 34 वर्षे) असं त्याचं नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यावर 1.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
🟥फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास (समर्थकास) अटक केले आहे. उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आली.
🔴त्याची अधिक सखोल चौकशी असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम (वय 34 वर्षे), रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे आहे. तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा आहे. गेल्या वर्षी 22 मार्च रोजी रोजी नेलगुंडा जंगल परिसरात 1 क्लेमोर व 2 कुकर बॉम स्फोटके लावून सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याच्या कामात त्याचा सहभाग होता. त्या अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल आहे गुन्हा अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.