Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यातील शेतकऱ्यांचा कापा फनस.- सुलगांव /आजरा - गडहिंग्लज रोडवर उपलब्ध. शेतकरी स्वतःच्या...

आजऱ्यातील शेतकऱ्यांचा कापा फनस.- सुलगांव /आजरा – गडहिंग्लज रोडवर उपलब्ध. शेतकरी स्वतःच्या फंणसाची विक्री व्यापाराकडे न देता विक्री करत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान.🛑आठवडा बाजार कर वसुली मनमानी पावतीचा घोळ – मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा. यांना अन्याय निवारण समितीचे निवेदन.

🛑आजऱ्यातील शेतकऱ्यांचा कापा फनस.- सुलगांव /आजरा – गडहिंग्लज रोडवर उपलब्ध. शेतकरी स्वतःच्या फंणसाची विक्री व्यापाराकडे न देता विक्री करत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान.
🛑आठवडा बाजार कर वसुली मनमानी पावतीचा घोळ – मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा. यांना अन्याय निवारण समितीचे निवेदन.

आजरा.- संभाजी जाधव.

आजरा तालुक्यातील काप्या फणसाचा सीजन चालू झाला असून आता तो व्यापाऱ्यांच्या ऐवजी स्वतः शेतकऱ्याकडून उपलब्ध होत आहे.
अतिशय रसाळदार व चवदार फणस आजरा तालुक्यातील असतो सद्यस्थितीत अल्प प्रमाणात मिळणारा हा फणस शेतकऱ्यांच्याकडून अगदी अल्प दरात मिळत आहे. फणसाची आवक जस जशी वाढत जाईल तसतशी व्यापाऱ्यांची गर्दी वाढत जाईल. पण सद्या तरी आपल्या घरच्या झाडाचा ताजा माल शेतकरी स्वतः विक्रीसाठी बसत असल्याचे ग्राहकाकडून समाधान मानले जात आहे. सदर फणसाची विक्री व्यापाऱ्याकडे न करता स्वतः शेतकऱ्यांनी आंबे व फणस विक्री करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. स्वतःच बसून जर फणस विक्री केली तर व्यापाराला अल्प दरात माल देऊन विक्रीचा कंटाळा करण्यापेक्षा तोच फणसाचा माल योग्य दरात ग्राहकाला दिल्यास ग्राहकांची लूट होणार नाही. व शेतकऱ्याचा फायदा होईल. ज्या दरात व्यापारी शेतकऱ्याकडून घेतात त्याच्यापेक्षा डबल दराने ते ग्राहकांना विक्री करत असतात. यामध्ये ग्राहकाची नेहमीच लूट होत असते.
त्यामुळे सद्यस्थितीत तरी रस्त्याच्या कडेला बिन भाड्याच्या गाळ्यात हवेशीर शेतकरीच विक्री करत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
फक्त शंभर दोनशे रुपयात आपल्याला आजरा गडहिंग्लज रोडवर शेतकरी बांधव आपल्या शेतातील झाडाचा फणस विक्री करत आहेत अशा रसाळ व रासायनिक फवारणी न करता पिकवलेला फणस ग्राहकांनी खरेदी करून शेतकऱ्याला मदत करावी…हाच एक अट्टाहास..

आठवडा बाजार कर वसुली मनमानी पावतीचा घोळ – मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा. यांना अन्याय निवारण समितीचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

नगरपंचायतीच्या वतीने ठेकेदारांमार्फत आठवडा बाजार कर वसुली केली जाते. यासह अन्य विषयाबाबत अन्याय निवारण समिती आजरा यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर कर वसुली मनमानी पध्दतीने केली जात असून आठवडा बाजारामध्ये शेतीमालासह इतर वस्तु व विक्रेत्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे याकरिता संबंधील विक्रेत्यांना कर आकारणी पावती देणे बंधनकारक करावे.
वापर करीत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार कर आकारणी असावी कर वसुली करणाऱ्याकडे नगरपंचायतीचे ओळखपत्र असावे. वरील सूचनेची तातडीने अंमलबजावणी करणेत यावी. अन्यथा आठवडा बाजार कर न भरण्याबाबत आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी.
आजरा शहर व इतर वसाहतीमध्ये गटारी साचलेमुळे डासांचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. याला प्रतिबंध व पुढील धोका टाळणेसाठी औषध फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने आपले स्तरावर औषध फवारणीसाठी लवकरात लवकर कार्यवाही व्हावी.‌ अशी मागणी निवेदनाने केली आहे या निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे, तसेच पदाधिकारी व सदस्य विजय थोरवत, सुधीर कुंभार, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, राजु विभुते, आनंद पठापा, अभिजीत सकपाळ, जोतिबा आजनेकर, संजय जोशी, दिनकर जाधव. सह अन्याय निवारण समितीच्या सही आहेत.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.