Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रहिरण्यकेशी सर्फनाला मध्यम प्रकल्प - अंतर्गत को. प. बंधारा साळगाव दुरुस्तीसाठी मंजुरी.(...

हिरण्यकेशी सर्फनाला मध्यम प्रकल्प – अंतर्गत को. प. बंधारा साळगाव दुरुस्तीसाठी मंजुरी.( या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या कडून कौतुक.)

हिरण्यकेशी सर्फनाला मध्यम प्रकल्प – अंतर्गत को. प. बंधारा साळगाव दुरुस्तीसाठी मंजुरी.
( या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या कडून कौतुक.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील साळगाव येथील बंधारा अंदाजे ५० / ६० वर्षांपूर्वी झालेला असावा या बंधारातील पाणी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त आहे. परंतु अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेल्या बंधाऱ्याला अखेर नाम. प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. हिरण्यकेशी सर्फनाला मध्यम प्रकल्प ता. आजरा अंतर्गत को. प. बंधारा साळगाव दुरुस्त करणेच्या कामास कोल्हापुर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर विभागाच्या बिगरसिंचन प्रापणसुची अंतर्गत सन २०२५-२६ करिता मंजुरी मिळणेबाबतचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडून संदर्भीय पत्र क्र.२ अन्वये प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापुर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर च्या सन २०२५-२६ बिगर सिंचन प्रापणसूचीमध्ये मंजुरी कळविण्यात आली आहे. यामधील कामाचे नावअंदाजपत्रकिय रक्कम रु. लक्ष ५८,७० हिरण्यकेशी सर्फनाला मध्यम प्रकल्प ता. आजरा अंतर्गत को.प. बंधारा साळगाव दुरुस्त करणे असे आहे.


तरी सदरची कामे करताना सार्वजनिक बांधकाम नियामवली मधील तरतुदीनुसार, तसेच वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निविदा विषयक शसन निर्णयाचे पालन करून आवश्यकतेनुसार सक्षम स्तरावरून वेळोवेळी मान्यता घेवून कामे करावीत. तसेच अतिरिक्त दायित्व नव्याने निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी ते दिलेल्या मंजुरी पत्रात म्हटले आहे.
सद्यस्थितीत या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद आहे. साळगाव येथील महालक्ष्मी देवीची यात्रा सोळा वर्षांनी होत आहे. या यात्रेच्या पूर्वी सदर बंधारा दुरुस्तीचे काम होणार असल्याचे समजते. यानंतर सदर बंदरा हा शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या पाण्यासाठी असाच राहणार असून येथे नव्या पुलाचे काम लवकरच मंजुरी घेऊन चालू करण्यात येणार असल्याचे देखील बोलले जाते.‌ या मार्गावरून जाणाऱ्या गारगोटी सह देवकांडगाव, विनायकवाडी, कोरीवडे, पेरणोली, साळगाव नागरिकांना व या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बरेच वर्षापासून प्रलंबित असलेल्या बंधारा कामाची मंजुरीचे कौतुक होत आहे. या कामी प्रा. अर्जुन आबिटकर, जितेंद्र भोसले, दयानंद निऊगरे सह ग्रामपंचायत, ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.