Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा साखर कारखान्याचे हंगाम २६/२७ करिता तोडणी वाहतूकी चे करारास प्रारंभ.

आजरा साखर कारखान्याचे हंगाम २६/२७ करिता तोडणी वाहतूकी चे करारास प्रारंभ.

आजरा साखर कारखान्याचे हंगाम २६/२७ करिता तोडणी वाहतूकी चे करारास प्रारंभ.

आजरा .- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६ /२७ सुरु करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक असणारे तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करणेस आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली. कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करावयाचे झाल्यास कारखान्यास सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्याने मागील हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणेचा विचार करून येत्या हंगामात ४. ५० लाख ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवून सदर ऊस गाळपासाठी आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे जरूरी असलेने हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करणेस आज सुरुवात केली आहे कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिह देसाई साहेब यांनी याप्रसंगी सांगितले कारखान्याचे पुढील काळात कारखाना लवकर सुरू करणेसाठी नियोजन करत आहोत कारखाना सध्या कमी दिवसांत जास्त गाळप करणे आता जरुरीचे झाले आहे.

तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील आपला ऊस लवकरात लवकर जावे अशी अपेक्षा असते त्यामुळे सक्षम यंत्रणा उभी करणे हे अत्यंत जरुरीचे आहे असेही याप्रसंगी सांगितले यावेळी कारखान्याचे साचालक रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, ऊस कंत्राटदार व कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.