Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदेश कोणाच्या हातामध्ये द्यायचा यासाठी निवडणूक.- तर काँग्रेसकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही.-...

देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा यासाठी निवडणूक.- तर काँग्रेसकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही.- खास. धनंजय महाडिक.( आजरा येथे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा संपन्न.)

देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा यासाठी निवडणूक.-तर काँग्रेसकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही.- खास. धनंजय महाडिक.
( आजरा येथे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

या देशांचे तिसऱ्यांदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार आहेत. पण देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा यासाठी ही निवडणूक काँग्रेस कडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण नाही. असे वक्तव्य आजरा येथील प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचार मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून खास. धनंजय महाडिक बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी केले पुढे बोलताना खास. महाडिक म्हणाले. काँग्रेसचा इतिहास एकदा डोळ्याखालून घातला तर ६८ वर्ष सत्ता हातात दिली. काय विकास केला. राहुल गांधी सह मागील अनेक पिढ्या एकच म्हणतात गरिबी हटाव पण गरिबी हटली का.? आजही तोच मुद्दा घेऊन प्रचार सभेत बोलतात. काँग्रेस काळात अनेक भ्रष्टाचार झाले पण भाजपच्या नेत्यांनी एक ही भ्रष्टाचार केलेला नाही असे काम भाजपचे आहे. यावेळी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून केलेल्या विकासाचा आढावा घेत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हाला मतदान करावे असे आवाहन यावेळी श्री महाडिक यांनी केले.
माहायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले मागील लोकसभा निवडणुकी त मला आपण प्रचंड मतांनी निवडून दिलात. परंतु आमचे एक मित्र ( सतेज पाटील त्यांचे नाव न घेता टीका.) म्हणत आहेत. कारण त्यांचं काही साध्य होईना आणि मागील वेळी त्यांना आम्ही आमंत्रण दिले नव्हतं. आमचं ठरलं आहे. असे म्हणून प्रचार चालू केला. व आता ते पुरोगामी विचारत आहेत. पहिला हिंदूवादी होते. आता पुरोगामी झालेत टीका करावी पण ती टीका योग्य असावी. कारखाना विकला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्या माझा खुलासा न घेता छापल्या. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे टीका होत आहेत. परंतु जनता माझ्यासोबत आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मला विजय करावे असे आवाहन उमेदवार श्री मंडलिक यांनी केले.


यावेळी बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चितच आहे. पण भाजपने केलेल्या विकासाचा विरोधी आघाडी अपप्रचार करत आहे. जनतेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या योजना दिल्या आहेत. रस्ते विकासातून विकास चालला आहे. पी. एम. किसान अनुदान वार्षिक ६००० केंद्रातून तर राज्यातून ६००० निधी शेतकऱ्याच्या हाताला मदत दिली आहे. वेगवेगळ्या महामार्गामुळे जमिनीचे वाढणार आहेत. आज रस्ते सुरळीत व सुरक्षित झाल्याने नागरिकांना सुखाचा प्रवास होणार आहे. मोदीजींनी फक्त घोषणा केल्या नाही तर विकास करून दाखवला आहे प्रा.‌ संजय मंडलिक यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत. आजरा तालुक्यातील प्रचंड मताची आघाडी प्रा. मंडलिक यांना द्यावी. { या मेळाव्याचे आयोजन केलेले अशोक चराटी म्हणजे आजरा तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण ठरवणारे नेतृत्व ‌आहे. } असे शेवटी बोलताना श्री घाटगे म्हणाले. ( महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्याने शाहू महाराजांना उमेदवारी.- आम. प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यात काही शंकाच नाही. परंतु काँग्रेसकडे उमेदवारच नसल्याने शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. या आघाडीत सक्षम उमेदवार आहे. देशात मोदींची लाट आहे संपूर्ण जिल्हा संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहिला आहे याच्या जोडीला आपलं मत खास.श्री. मंडलिकांना व पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी द्यावे. मागील दहा वर्षात देशात राज्यात व आपल्या विभागात भरपूर केंद्र व राज्य सरकारमधून विकास झाला आहे. अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पुन्हा एकदा या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी व नरेंद्र मोदी यांना पण पूर्ण करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून प्रा. मंडलिक त्यांना पचन मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार श्री आबिटकर यांनी केले.)
यावेळी माजी मंत्री भरमु पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी आजरा ता. अध्यक्ष भाजप अनिरुद्ध केसरकर, भाजपचे कामगार संघटनेचे शिवाजीराव पाटील, भाजपच्या अनिता चौगुले, माजी. जि प. सदस्या सुनिता रेडेकर, माजी. जि प सदस्य संग्रामसिंह कुपेकर, मनसेचे आनंदा घंटे, सुधीर सुपल, भाजपचे अरुण देसाई, सुधीर कुंभार, मलिककुमार बुरुड, जितेंद्र टोपले, शिवसेनेचे संजय पाटील, अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक प्रमुख पदाधिकारी महायुतीचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदार महिला आघाडी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भैय्या टोपले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.