Home कोंकण - ठाणे गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी ५५ लाख ठेव संकलन.- स्वामी विवेकानंद.🛑आजरा...

गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी ५५ लाख ठेव संकलन.- स्वामी विवेकानंद.🛑आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा. 🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये ठेवींचे संकलन.🛑ग्राहकांना केंद्र स्थानी मानून विक्रेत्याने सेवा द्यावी. काशिनाथ मोरे

Oplus_131072

🛑गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी ५५ लाख ठेव संकलन.- स्वामी विवेकानंद.
🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये ठेवींचे संकलन.
🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये ठेवींचे संकलन.
🛑ग्राहकांना केंद्र स्थानी मानून विक्रेत्याने सेवा द्यावी. काशिनाथ मोरे

🛑गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी ५५ लाख ठेव संकलन.- स्वामी विवेकानंद.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने गुढीपाडव्याच्या मंगल पर्वावर रू. ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० इतक्या विक्रमी ठेव संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गुढीपाडवा हा नवसंवत्सराचा उत्सव असुन या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल रू. ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.

सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सांगितले या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेकडे एकूण रू. १९० कोटींच्या ठेवी, रू. १५३ कोटी कर्जवाटप, ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना जलद व ऑनलाईन सेवा देणेसाठी संस्था लवकरच कोअर बँकिंग सिस्टीम लागू करत आहे.
संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये ठेवींचे संकलन.

आजरा.- प्रतिनिधी.

जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या., आजरा संस्थेमध्ये गुढीपाढव्यानिमित्त ७ शाखांमध्ये मिळून तब्बल १ कोटी ३५ लाख ९१ हजार इतक्या ठेवींचे संकलन झाले. अशी माहिती जनता सह गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिले. श्री. मोरे म्हणाले शाखा आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली, पाटणे फाटा (ता. चंदगड) या शाखेमधून वरीलप्रमाणे टेवी जमा झाल्या असुन याकामी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखांचे संचालक मंडळ व मुख्य कार्यालय अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी व स्टाफ यांनी विशेष प्रयत्न करुन ठेवीचे संकलन केले. याबददल संस्थेचे चेअरमन श्री. मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.

🛑आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात १४७९ नवीन खाती उघडून तब्बल ८ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे ११२८ कोटी रूपयाच्या ठेवी व ७६८ कोटी रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १८९६ कोटी इतका झाला आहे. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख मा.श्री. अशोकअण्णा चराटीसो, व्हा. चेअरमन मा.श्री. संजय चव्हाणसो व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बँकेने केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP तसेच राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच अॅपलच्या कोणत्याही प्रोडक्ट्ससाठी माफक व्याजदरात अॅपल कर्ज योजना व पर्यटकांसाठी हमसफर कर्ज योजना राबविल्या आहेत. बँकेमध्ये आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे मत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी यांनी व्यक्त केले.

🛑ग्राहकांना केंद्र स्थानी मानून विक्रेत्याने सेवा द्यावी. काशिनाथ मोरे

आजरा.- प्रतिनिधी.

जगात सुई पासून विमाना पर्यंत, वेगवेगळे उत्पादने होत असताना, ग्राहकांना केद्रस्थानी मानुन, उत्पादक व विक्रेत्यानी सेवा द्यावी असे मत आजरा तहसीलदार कार्यालयातील जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक काशिनाथ मोरे यांनी मानले. अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार माळसाकांत देसाई होते. प्रास्ताविक सोनाली चिमणे केले. मोरे यानी बोलताना. ग्राहकाना असणारे अधिकाराचा वापर करताना वस्तू,सेवा तपासून व समजून घेवून अधिकृत बिलाची मागणी करावी. शासनाच्या वतीने ग्राहकासाठी अनेक कायदे तयार केले आहेत. त्यासाठी ग्राहकानी जागे होणे आवश्यक आहे. सर्व सेवाचे दर पत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असलेचे सांगितले. माळसाकांत देसाई यांनी आजच्या ग्राहक दिना निमित्ताने आठरा विभागाच्या प्रमुखाना निमत्रण देऊन ही प्रतिनीधी हजर राहत नसतील तर त्याना नोटीसा पाठवून प्रत्येक विभागवार चर्चा केली जाईल. तसेच गँससिलेडर सर्वसामान्य पर्यंत वेळेत पोहच करावे असे आवाहन केले. यावेळी ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष महादेव सूतार, अखिल भारतीत ग्राहक तालुका अध्यक्ष गुंडू परीट,ग्राहक फेडरेशनचे बंडोपंत चव्हाण, संजय घाटगे,शशिकांत सावंत, संजय येसादे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी नायब तहशिलदार विकास कोलते,संगिता किल्लेदार अशोक पाटील, गौरव सुतार, निवृती मिसाळे, आप्पा गुरव याच्या सह ग्राहक पंचायत पदाधिकारी व ग्राहक उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार संदीप पाटील पुरोठा विभाग आजरा यानी मानले.

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.