🛑विद्या मंदिर शेळप प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात संपन्न.
🟣आजरा उपसभापती यांची दालनात एन्ट्री.-
🟣विद्या मंदिर शेळप शाळेत महिला मेळावा उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

विद्या मंदिर शेळप शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकू व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आजरा च्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार होत्या. कार्यक्रमानिमित्त महिलांच्या संगीत खुर्ची, मकडी चाल, फुगे फोडणे व जोडीदाराच्या मदतीने फुगा घेऊन धावणे या फनी गेम्स घेण्यात आल्या. मुख्याध्यापक संभाजी बापट यांनी आपल्या प्रस्ताविकात शाळेने वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भविष्यातील येणाऱ्या समस्यांचा वेध घेऊन शाळा विद्यार्थ्यांप्रती गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कसा भर देत आहे याची माहिती दिली. स्पर्धेमधील विजेत्या सौ. माधवी तेजम, सौ. अंकिता नार्वेकर, सौ. अश्विनी डोंगरे सौ. सोनाली माडभगत, सौ. नीता नवार, सौ. कविता पाटील यांना उपसभापतींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. महिला आरोग्य व आजची स्त्री या विषयावर हाळोली शाळेच्या अध्यापिका सौ अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला बचत गट व महिलांना येणाऱ्या समस्या याबाबतीत महिलांनी पंचायत समितीशी संपर्क करावा असे आवाहन उपसभापतीनी केले. महिलांच्या समस्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे उपस्थित महिलांना आश्वासन दिले. उपसभापतीनी शाळा व कामकाजाची पाहणी करून शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच अर्जुन बागडी व ज्येष्ठ सदस्य सुधाकर पाटील, महिला सदस्या सौ. उर्मिला गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचलन परमेश्वर नलवडे यांनी केले तर आभार रवींद्र नावलकर यांनी मानले.

🟣आजरा उपसभापती यशोदा पोवार यांची दालनात एन्ट्री.-
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पंचायत समिती उपसभापती यशोदा पोवार यांची आज दि २० रोजी उपसभापती जादनात प्रवेश केला या दालनाचे उद्घाटन आजरा कारखाना चेअरमन मुकुंदराव देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गटविकास अधिकारी सुभाष सावंत, जि. प. सदस्य सुधीर देसाई, शिवसेनेचे संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार सहायक गट विकास अधिकारी श्री शेटे , राजू होलम, शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, सह राष्ट्रवादी दोन्ही गटाचे, व शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

