शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्थेत गुढीपाडव्यानिमित्त १ कोटी ६० लाखांच्या ठेवी जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करत असतानाच, शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय व दोन शाखा सह आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत एकाच दिवसात १ कोटी ६० लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्याचा विक्रम केला आहे. सभासद आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संस्थेने विशेष ठेव योजना राबवली होती, ज्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेची पारदर्शक कारभार पद्धत आणि ग्राहकांसाठी असलेल्या आकर्षक व्याजदरामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. जमा झालेल्या या ठेवींचा उपयोग संस्थेच्या विस्तारासाठी आणि गरजू सभासदांना कर्ज पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सभासदांच्या सहकार्याला दिले आहे. “जे.पी. नाईक यांच्या नावाने सुरू असलेल्या या संस्थेने नेहमीच सामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केले आहे आणि आजच्या या गुंतवणुकीमुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे,” असे मत व्यवस्थापनाने व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, जनरल मँनेजर व कर्मचारी उपस्थित होते.
