लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी महाराज यांचा आजरा दौरा.
आजरा.- प्रतिनिधी.

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी महाराज यांनी आजरा तालुक्यात ठीक ठिकाणी गाठीभेटी घेत दौरा केला.

या गाठीभेटीदरम्यान शिवसेना उबाठा गटाचे संभाजी पाटील, माजी जि. प चे. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, राष्ट्रवादीचे मुकुंदराव देसाई, उदयराज पवार, राजू होलम,

मनसेचे परशराम बामणे, तसेच इंद्रजीत देसाई सिकंदर दरवाजकर, बशीर तखिलदार, नौशाद बुड्ढेखान, सलीम लतिफ, अभिषेक शिंपी भाजपचे मलिक बुरुड, अरुन देसाई,

जवाहर पतसंस्थेचे इकबाल शेख सह आजरा तालुक्यातील अनेक विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.
यावेळी स्वराज्य सेनेचे संजय पवार सुरज माने विशाल रेळेकर, दिनेश कुरुलकर सह सहकारी उपस्थित होते.

